बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांनी नवीन वर्षांचे जंगी सेलिब्रेशन करत स्वागत केले. त्यांनी संपूर्ण कुटुंबासहित सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षांचे स्वागत केले. सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियारवर चांगलेच व्हायरल होताना बघायला मिळाले. मात्र या सगळ्यामध्ये रणबीर आलियाची लेक राहाने लक्ष वेधून घेतले आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये राहा नेहमीप्रमाणे रणबीरकडे असलेली दिसून येत आहे. तिने फ्लोरल फ्रॉक परिधान केला असून खूपच गोड दिसत आहे. याआधीही एअरपोर्टवर राहाला आई-वडिलांबरोबर स्पॉट केले होते. त्यावेळी तिने तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना बाय म्हणत फ्लाइंग किस दिले होते. तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत राहिला होता. (ranbir kapoor with family)
अशातच आता कपूर कुटुंबाने नव्या वर्षांचे जंगी स्वागत केलेले दिसून आले. यावेळी रणबीर-आलिया व्यतिरिक्त नितू कपूर, सोनी राजदान, रिद्धिमा कपूर साहनी व तिचा पती भरत साहनी दिसून आले. या सेलिब्रेशनवेळी सगळ्यांचेच मस्त फोटो व्हायरल होताना दिसते. यातील काही फोटो रिद्धिमाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नितू यांनी देखील सोशल मीडियावर नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या सगळ्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे.
एका चाहत्याने लिहिले की, “यामध्ये रणबीर खूप हँडसम दिसत आहे”, तसेच दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “कधी कोणाची नजर न लागो”.तसेच यासगळ्यामध्ये रणबीरला बिलगलेल्या राहावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या. राहाचे सगळ्यांनी खूप कौतुक केले आहे. दरम्यान नाताळ निमित्ताने स्टारकीडचा नवीन व्हिडिओ समोर आला होता. ख्रिसमसच्या दिवशी राहा पुन्हा एकदा माध्यमांसमोर आली. यावेळी न घाबरता, न लाजता तिथे उभ्या असलेल्या पापाराझींना हाय करत फ्लाइंग किस दिले होते.
त्यानंतर तिघेही पुन्हा एकदा एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. यावेळी राहाला आलियाने उचलून घेतले होते. राहाची नजर पापाराझींवर पडताच ती मोठ्याने ओरडून बाय असं म्हणाली आणि फ्लाइंग किसदेखील दिला. राहाच्या या कृतीने आलियाला खूप हसू आले होते. तसेच रणबीरदेखील हसू लागला होता. दरम्यान हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.