‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. महाराष्ट्रातील तमाम महिलावर्ग हा आदेश बांदेकरांचा चाहता आहे. सिनेसृष्टीतील प्रवासात त्यांनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे. ‘खेळ मांडीयेला’, ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमांच्या निवेदनाची संपूर्ण जबाबदारी आदेश यांनी एकहाती सांभाळली. (Soham Bandekar On Aadesh Bandekar)
आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे. आदेश बांदेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकरही उत्तम कलाकार म्हणून काम करत आहेत. सोहम व सुचित्रा यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून उत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बांदेकर कुटुंबीय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच आदेश बांदेकर यांनी शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत आदेश बांदेकर त्यांच्या नातवासह एकत्रित वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी नातवाला खांद्यावर उचलून घेतलेलं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ते नातवासह फूड एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यांच्या नातवाचं नाव राजवीर आहे. आदेश यांनी शेअर केलेल्या या फोटोंवरून सोहम बांदेकरने शेअर केलेली स्टोरी लक्ष वेधून घेत आहे.
आदेश यांनी त्यांचा नातवाला खांद्यावर उचलून धरलेलं पाहून सोहमने कमेंट करत म्हटलं आहे की, “हा आताच डोक्यावर बसला आहे. अजून काय बाकी आहे”. सोहमने गमतीशीर अंदाजात केलेली ही पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आदेश बांदेकर शूटिंगमधून वेळात वेळ काढून ते कुटुंबासह नेहमीच एकत्र वेळ घालवत असतात. अशातच यावेळी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला गेलेले पाहायला मिळत आहेत.