बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांची सध्या चर्चा सुरु असताना पाहायला मिळते. त्यातील ‘ॲनिमल’ हा चित्रपट त्याच्या हटके अंदाजासाठी बराच चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक सुरुवातीपासूनच वाट पाहत आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रित झालेल्या या चित्रपटातील बऱ्याच विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जवळ येत असल्यामुळे चित्रपटाबाबत आणखीनच उत्सुकता वाढली आहे. नुकताच ‘ॲनिमल’ चित्रपटाचा ६० सेकंदाचा ट्रेलर जगातील सर्वात उंच इमारतीवर म्हणजेच दुबईच्या बुर्ज खलीफावर दाखवण्यात आला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतो आहे.(animal film short video played on burj khalifa)
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबर रणबीर पहिल्यांदाच चित्रपटात काम करत आहे. निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाचा टीझर संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच हा ट्रेलर जगातील सगळ्यात उंच इमारतीवर बुर्ज खलीफावर दाखवण्यात आला. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात हा ट्रेलर जेव्हा तिथे दाखवण्यात आला तेव्हा चित्रपटातील कालाकारही तिथे उपस्थित होते. त्यात अभिनेता रणबीर कपूरसह बॉबी देओल व भूषण कुमार यांनी चाहत्यांना तो ट्रेलर पाहतानाचा क्षण आपल्या डोळ्यांनी टिपला.
रणबीरने हा ऐतिहासिक क्षण त्याच्या मोबाईलमध्येही कैद करुन घेताना दिसला. यावेळी रणबीरने काळ्या रंगाची पँट व काळ्या रंगाचा स्वेटर घातला होता. बॉबीदेखील यावेळी इथे उपस्थित होता. त्याने ग्रे ट्राउजरसह सफेद रंगाचं शर्ट घातलं होतं. त्यात तो खूप देखणा दिसत होता. यांनी तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांसह सेल्फीदेखील काढली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे.
आता या चित्रपटाची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटातील रणबीरची रफ अँड टफ भूमिका पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. चित्रपटात तो पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर दिसणार आहे. याशिवाय अनिल कपूरही चित्रपटात रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.