शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अचानक बातमी आली बाबा गेले…”, प्रसिद्धी, पैसा असूनही प्रसाद खांडेकरला वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत, म्हणाला, “माझ्या मुलाला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 18, 2023 | 1:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Khandekar Struggle

"अचानक बातमी आली बाबा गेले…", प्रसिद्धी, पैसा असूनही प्रसाद खांडेकरला वाटतेय 'या' गोष्टीची खंत, म्हणाला, "माझ्या मुलाला…"

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसाद खांडेकरने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटवली. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक म्हणून एकदा येऊन तर बघा हा त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना स्वबळावर प्रसादने स्वतःच विश्व स्वतः तयार केलं आहे. ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसादने खंत व्यक्त केली आहे. (Prasad Khandekar Struggle)

प्रसिद्धी, पैसा हे सर्वकाही असताना अशी कोणती गोष्ट आहे जी मिस झाली, असा प्रश्न प्रसाद खांडेकरला विचारला असता, त्याने उत्तर देत म्हटलं, “घरच्यांना वेळ देता येत नाही आहे. २०१६-१७ नंतर मी स्वतःच नवं घर घेतलं. आणि श्लोकचा जन्मही २०१६चा आहे. त्यानंतर २०१९ पासून ‘हास्यजत्रा’ सुरु झालं शिवाय नाटक वगैरे सुरूच होतं. माझ्या माझ्या जीवावर सर्व सुरु होतं मला कुठूनही पाठिंबा नव्हता. माझं एक वाक्य आहे जे मी प्रत्येक मुलाखतीत सांगतो, जर मला संधी मिळत नसेल तर मी माझ्या माझ्या संधी निर्माण करू लागतो”.

आणखी वाचा – ‘इंडियन आयडल’च्या रनअरपच्या गंभीर आरोपांवर अभिजीत सावंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “लोकांनी त्याचे कान भरले आणि…”

पुढे तो म्हणाला, “दिग्दर्शक म्हणून सुरुवातीला मला व्यावसायिक नाटक कोणी द्यायला तयार नव्हतं, तेव्हा आमच्या एकांकिकेचा पैसा एवढा जमा झाला होता तेव्हा आम्ही स्वतः नाटकाचे प्रयोग सुरु केले. असा मी माझा माझा प्रवास सुरु केला. एकदा मी घरी आलो तेव्हा असं झालं की, माझा पाच वर्षांचा मुलगा फाडफाड इंग्लिश बोलत होता, आणि तेव्हा माझं असं झालं की, मी माझ्या मुलाला मोठं होताना पाहिलंच नाही. मोठा होऊन तो इंग्लिशमध्ये कविता बोलताना दिसतोय. तर ही खंत मला नेहमी वाटते”.

यापुढे बोलताना प्रसाद म्हणाला, “आणि एक अजून खंत सांगायची म्हणजे, मी १४ वर्षांचा असताना माझे बाबा गेले. माझ्या वाचनाच्या आवडीपासून बऱ्याच चांगल्या सवयी त्यांनी मला लावल्या होत्या. मी तेव्हा चंपक, ठकठक ही गोष्टीची पुस्तक वाचायचो. त्यानंतर त्यांनी मला ग्रंथालयात वाचनासाठी पाठवलं तेव्हा तिकडे ही मी हीच गोष्टींची पुस्तकं वाचू लागलो, पण एकेदिवशी बाबा मला ओरडले आणि त्यांनी मला रामचंद्र सडेकरांचं ‘सोनेरी टोळी’ हे पुस्तक वाचायला सांगितलं”.

आणखी वाचा – Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding : संगीत सोहळ्यामध्ये अमृता-प्रसादचा रोमँटिक डान्स, होणाऱ्या बायकोसाठी केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे सर्वत्र होतंय कौतुक

त्यानंतर प्रसाद म्हणाला, “एके दिवशी ‘सोनेरी टोळी’ हे पुस्तक मला मिळालं. ते पुस्तक मिळालं तेव्हा मला ते पुस्तक सुरुवातीला माझ्या बाबांना दाखवायचं होतं. मी सायकल घेऊन घरी आलो तेव्हा कळलं बाबा डेरीमध्ये गेलेत. आमची दुधाची डेरी होती. डेरीमध्ये गेलो तेव्हा कळलं बाबा शाखेत गेले आहेत. माझे बाबा शिवसेना पक्षात शाखाप्रमुख होते. शाखेत गेलो तर कळलं की दुसऱ्या दिवशी शाखेचा भगवा सप्ताह आहे तर ते तिकडे निघून गेले. आणि रात्री अचानक बातमी आली की बाबा गेले आहेत. त्यामुळे त्यांना ते पुस्तक शेवटपर्यंत दाखवायचं राहिलं” प्रसादने यावेळी त्याच्या प्रत्येक भावना व्यक्त केल्या.

Tags: entertainmentmaharashtrachi hasy jatramarathi actorprasad khandekarprasad khandekar struggle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
animal film short video played on burj khalifa

Video : जगातील उंच इमारतीवर दाखवण्यात आला ‘ॲनिमल’चा ट्रेलर, ऐतिहासिक क्षण पाहताना रणबीर कपूर भावुक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.