शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदाचा आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ संपला, शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओमध्ये रडताना दिसले अन्…; म्हणाले, “तो दिवस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 8, 2023 | 12:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar Video

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदाचा आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ संपला, शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओमध्ये रडताना दिसले अन्...; म्हणाले, "तो दिवस..."

‘होम मिनिस्टर’ म्हटलं की आदेश बांदेकर यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. संबंध महाराष्ट्रातील महिलावर्गाचे लाडके भावोजी म्हणून आदेश यांना ओळखलं जातं. याशिवाय आदेश बांदेकर यांची ओळख म्हणजे शिवसेना पक्षातील त्यांचा वावर. शिवसेना पक्षात कार्यरत असल्यापासून आदेश बांदेकर यांनी भरपूर काम केलं. मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली. गेली अनेक वर्ष या कार्याअंतगर्त देशावर, राज्यावर वा मुंबईवर आलेल्या अनेक संकटांच्या काळात न्यासाने सढळ हस्ते मदतीचा हात पुढे केला. (Aadesh Bandekar Video)

महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. याबाबतची एक पोस्ट शेअर करत आदेश बांदेकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा जुना व्हिडीओ असून २०१९ साली जेव्हा त्यांची या पदासाठी निवड झाली होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यांत आदेश बांदेकर कर्मचाऱ्यांसह आनंद शेअर करताना दिसत आहे. यावेळी आदेश बांदेकर यांना अश्रूही अनावर झाले आहेत.

आणखी वाचा – आधी ललित मोदी आता पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात आहे सुष्मिता सेन, दिवाळी पार्टीमध्ये हातात हात घेतला अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

पोस्ट शेअर करत आदेश बांदेकर म्हणाले की, “क्षण आनंदाचा. २४ जुलै २०१७ रोजी कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ न्यासाचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा आशीर्वाद मला मिळाला आणि तिथून २३ जुलै २०२३ पर्यंतची ६ वर्षं अविस्मरणीय गेली. न्यासाच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून अनेक चांगली कामं आणि भाविकांची सेवा करता आली. श्री सिद्धिविनायकाचा महिमा प्रत्यक्ष अनुभवता आला.”

आणखी वाचा – लग्नाच्या १३ वर्षांनी हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, म्हणाली, “त्याने मला…”

“पण या साऱ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे १२९ अस्थायी कर्मचारी जे अनेक वर्ष अल्प मानधनात काम करत होते, त्यांची नोकरी कायम व्हावी यासाठी पाठपुरावा करून त्यांना सेवेत कायम करण्याचा! २०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. हे काम मी केले नाही, श्री सिद्धिविनायकांनी करुन घेतले.”

Tags: Aadesh Bandekaraadesh bandekar videoentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
"मला तिच्यासाठी…", ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनच्या लग्नावर सलमान खानने दिलेली प्रतिक्रिया पुन्हा चर्चेत, म्हणालेला, "चांगल्या घरात…"

"मला तिच्यासाठी…", ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनच्या लग्नावर सलमान खानने दिलेली प्रतिक्रिया पुन्हा चर्चेत, म्हणालेला, "चांगल्या घरात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.