अभिनेता सलमान खानने गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये आपला जलवा कायम ठेवला. जेव्हा अभिनेत्याचा एखादा चित्रपट येतो, तेव्हा चाहत्यांना याची मोठी उत्सुकता लागलेली असते. पण अभिनेता जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत येतो, तितकाच त्याच्या अफेअर्स व वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आलेला आहे. त्यापैकी एक म्हणजे, अभिनेत्री ऐश्वर्या राय बरोबरचं अफेअर. सलमान व ऐश्वर्या हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची त्यावेळी जोरदार चर्चा होत होती. (Salman khan on Aishwarya Rai Wedding)
मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाले, ज्यामुळे दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. काही काळानंतर २००७मध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चनसह विवाहबंधनात अडकली. त्यांच्या शाही विवाहाची त्याकाळी बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, या लग्नानंतर काही वर्षांनी सलमानने तिच्या लग्नाबद्दल एक प्रतिक्रिया दिली होती, ज्याची त्यावेळेस बरीच चर्चा झाली होती. सलमानने २०१० मध्ये ‘इंडिया टीव्ही’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाला, “ती (ऐश्वर्या) अभिषेकसह विवाहबंधनात अडकल्याने मी खूप आनंदित आहे. अभिषेक एका चांगल्या घरातला आहे आणि तो चांगला माणूसदेखील आहे. तसेच मला तिच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट हवी, ती म्हणजे ती आनंददायी जीवन जगते.”
हे देखील वाचा – आधी ललित मोदी आता पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात आहे सुष्मिता सेन, दिवाळी पार्टीमध्ये हातात हात घेतला अन्…; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ऐश्वर्यानेही सलमानबरोबरच्या ब्रेकअपनंतर काही वर्षांनंतर एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत देताना ऐश्वर्या त्यावेळी म्हणाली होती, “सलमान मला सतत फोन करुन त्रास द्यायचा. त्याला माझं सहकलाकाराशी अफेअर असल्याचा संशय आला होता. शाहरुख खानपासून ते अभिषेकपर्यंत त्याने माझं नाव जोडलं होतं. अनेकदा तो दारूच्या नशेत येऊन मला मारहाण करायचा. जर मी कधी त्याचा फोन उचलला नाही, तर तो स्वत:ला इजा करुन घ्यायचा. या घटनेनंतर त्याने मला इतका त्रास दिला होता, की मला यामुळे अनेक दुःख भोगावे लागले होते. त्यामुळे मी त्यांच्याबरोबरचे सर्व संबंध संपवले.”
हे देखील वाचा – लग्नाच्या १३ वर्षांनी हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, म्हणाली, “त्याने मला…”
दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, ऐश्वर्या लग्नानंतर तिचं वैवाहिक आयुष्य आनंदाने व्यतित करत आहे. अभिषेक व ऐश्वर्याला आराध्या नावाची एक मुलगी आहे. तर, सलमानचं या नात्यानंतर अनेक अभिनेत्रींसह नाव जोडले गेले. असं असूनही तो अविवाहित राहिला आहे. त्याच्या कामाबद्दल सांगायला गेल्यास, सलमानचा ‘टायगर ३’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.