झी मराठी वाहिनीवरील ‘होममिनिस्टर’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहोचलेले तमाम वहिनींचे लाडके भावोजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर होय. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. आदेश बांदेकर यांनी अनेक मराठी मालिका, नाटक व चित्रपटांमध्येही काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही आदेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Aadesh Bandekar Instagram)
आदेश भावोजींना होममिनिस्टर या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे भावोजी अशी खास ओळख मिळाली. या कर्यक्रमामुळे अनेकदा ते दौरे करतानाही दिसले. महाराष्ट्रातील विविध राज्यात ते पैठणीचा खेळ घेऊन जाताना दिसतात. संपूर्ण महाराष्ट्रातील महिलावर्ग आदेश बांदेकर यांच्या खेळाकडे तसेच मिळणाऱ्या मानाच्या पैठणीकडे डोळे लावून बसलेले असतात.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केली महागडी कार, वाढदिवसाला स्वतःलाच सेल्फ गिफ्ट केलं अन्…
चित्रीकरणाच्या या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून आदेश बांदेकर त्यांच्या कुटुंबियांसह क्वालिटी टाइम घालवताना दिसले. आदेश यांनी वेळात वेळ काढून त्यांच्या फॅमिलीसह देवदर्शन करताना दिसले. अशातच फॅमिली बरोबर क्वालिटी टाइम घालवल्यानंतर ते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. देवदर्शनाचा प्रवास केल्यानंतर लगेचच ते खेळ मांडीयेला कार्यक्रमासाठी संगमनेरच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी प्रवासादरम्यानच्या एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. “प्रवास. आनंदयात्रा सुरुच” असं कॅप्शन देत त्यांनी हा प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
बांदेकर कुटुंब नवीन वर्षाच्या मूहूर्तावर देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी या प्रवासाला आनंदयात्रा असं म्हटलं आहे. आदेश यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. बांदेकर कुटुंबीय गाणगापुर, अक्कलकोट व तुळजापुर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले असल्याचे त्यांनी या पोस्टद्वारे म्हटलं होतं. आदेश यांनी हा फोटो शेअर करत “प्रवास सहकुटुंब ट्रेनचा.. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर दर्शनाचा.. योग आनंदयात्रेचा” असं कॅप्शन दिलं होतं.