बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खरेदी केली महागडी कार, वाढदिवसाला स्वतःलाच सेल्फ गिफ्ट केलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 9, 2024 | 4:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Tanksale New Car

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खरेदी केली महागडी कार, वाढदिवसाला स्वतःलाच सेल्फ गिफ्ट केलं अन्…

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी या नव्या वर्षात चाहत्यांसह गुडन्यूज शेअर करताना दिसत आहेत. काहींनी नवीन घर घेतलं असल्याची, तर काहींनी नवी गाडी घेतल्याची, तर काहींनी नवा उपक्रम केला असल्याचं सांगितलं. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. नववर्षाचं व स्वतःच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या मराठमोळ्या कलाकाराने आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली. (Akshay Tanksale New Car)

नवी कोरी गाडी घेतली असल्याची गुडन्यूज अभिनेता अक्षय टंकसाळे याने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसह शेअर केली आहे. “माझ्याकडून मलाच वाढदिवसाची भेट. आवडली, घेतली. तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार आणि खूप प्रेम” असं कॅप्शन देत अक्षयने नव्या गाडीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अक्षयचे आई -बाबा ही गाडीजवळ उभे असलेले पाहायला मिळत आहेत. अक्षयने त्याच्या वाढदिवसानिमित्त ही आलिशान गाडी खरेदी केली आहे.

आणखी वाचा – Video : उदयपुरच्या पॅलेसमध्ये लुंगीवरच नाचू लागला आमिर खानचा मराठमोळा जावई, लेकही बेभान होऊन नाचत होती अन्…

View this post on Instagram

A post shared by Akshay Tanksale (@akshaytanksale)

अक्षयच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह त्याच्या अनेक चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिजित खांडकेकर, सिद्धार्थ मेनन, रितिका श्रोत्री, पूर्वा राजेंद्र या कलाकारांनी अक्षयच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याच्या या पोस्टला लाईक केलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “तिला तेव्हा बोलताही येत नव्हतं अन्…”, वहिनीच्या आठवणीत रडू लागला हार्दिक जोशी, अभिनेत्याला म्हणालेली, “माझ्याकडून पैसे घ्यायला…”

‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘बस्ता’, ‘सातारचा सलमान’, ‘चौक’, ‘पिल्लू बॅचलर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून महत्तवपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. विनोदी, हलकी-फुलकी, रावडी भूमिका साकारत आजवर अक्षयने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Tags: akshay tanksaleakshay tanksale new carentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
raj thackeray said marathi actors you should give respect to each other in marathi 100th natya sammelan

"तर लोक तुम्हाला मान का देतील?", मराठी कलाकारांना राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले "अद्या, फद्या, अंड्या बोलता अन्..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.