शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : महाबळेश्वरमध्ये शेतात कांदे, लसूण, बीट, टोमॅटो अन् इतर भाज्या पिकवते मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचाही आहे मळा, दिसली संपूर्ण झलक

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress mrunmayee deshpande shared her farm view from mahabaleshwar in instagram live video

Video : महाबळेश्वरमध्ये शेतात कांदे, लसूण, बीट, टोमॅटो अन् इतर भाज्या पिकवते मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचाही आहे मळा, दिसली संपूर्ण झलक

मराठी नाटक, मालिका व चित्रपट यातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री सूत्रसंचालनदेखील करते. मृण्मयी देशपांडे व तिचा पती स्वप्नील राव ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडते. मृण्मयी व स्वप्निल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एकमेकांबरोबचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.  (Mrunmayee Deshpande on Instagram)

गेल्या काही वर्षांपासून मृण्मयी अभिनयाव्यतिरिक्त शेती करण्यात चांगलीच रमली असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनयातून मोकळा वेळ मिळाला की ती तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करत असते. ती अनेकदा शेतातले फोटो व व्हिडीओही चाहत्यांसह शेअर करत असते. त्यानंतर आता तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे. अशातच मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे तिच्या शेतीची एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यात तिने शेतीबद्दलची माहितीसुद्धा दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

आणखी वाचा – “तिला तेव्हा बोलताही येत नव्हतं अन्…”, वहिनीच्या आठवणीत रडू लागला हार्दिक जोशी, अभिनेत्याला म्हणालेली, “माझ्याकडून पैसे घ्यायला…”

गेले काही दिवस मृण्मयी तिच्या बहिणीच्या लग्नामध्ये चांगलीच व्यस्त होती. मात्र या व्यस्ततेमधून वेळ काढून तिने शेतात काही पिकांची लागवड केली आहे. फराशी, मुळा, बीट, टोमॅटो, स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकांची लागवड या शेतात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. मृण्मयीने सेंद्रिय पद्धतीने शेती करत शेती व्यवसाला चालना देत आहे. स्वप्नीलला सहकार्य करत मृण्मयीने या शेतीची लागवड केली आहे.

आणखी वाचा – “दुनिया तुमच्यावर हसत आहे आणि…”, अंकिता लोखंडेच्या आईने दोघांनाही सुनावलं, पण सासूसमोरच बायकोला ओरडला, म्हणाला, “तुला आयुष्यात…”

दरम्यान, महाबळेश्वरमधील मालुसरे या गावात मृण्मयी तिची शेती करत असून या शेतीसाठी तिला कुटुंबियांचीदेखील मदत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची आई, नवरा व इतर भावंडेही शेती करताना पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओखाली चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या कमेंट्समध्ये तिचे कौतुकही केले आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainemnt newsmarathi entertainmentMarathi newsmrunmayee deshpandeswapnil raoमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमृण्मयी देशपांडेस्वप्नील राव
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death Case
Social

बेडरुममध्ये कॅमेरा, पत्नीबरोबर लाईट सुरु ठेवत शारीरिक संबंध अन्…; हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे काळे धंदे, संपूर्ण प्रकार उघड

मे 23, 2025 | 5:25 pm
Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Next Post
Akshay Tanksale New Car

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खरेदी केली महागडी कार, वाढदिवसाला स्वतःलाच सेल्फ गिफ्ट केलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.