रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आओगे जब तुम साजना’ फेम सुप्रसिद्ध गायक राशिद खान यांचे निधन, ५५व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी  

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2024 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
aaoge jab tum saajna famous singer Rashid Khan passes away because of cancer see the details

‘आओगे जब तुम साजना’ फेम सुप्रसिद्ध गायक राशिद खान यांचे निधन, ५५व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Rashid Khan passed away : संगीत विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायकांपैकी एक उस्ताद रशिद खान यांचे निधन झाले आहे. ते ५५ वर्षाचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. राशिद खान यांच्या निधनाबद्दल बोलताना रुग्णालयाच्या अधिकऱ्याने असे म्हटले की, “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आमचे प्रयत्न अपुरे पडले. आज दुपारी ३.४५च्या सुमारास राशिद यांचे निधन झाले आहे.”

बंगालच्या मुख्यमंत्री यांनी आपले दु:ख व्यक्त करत असे म्हटले आहे की, “संपूर्ण देशासाठी आणि संपूर्ण संगीत समुदायासाठी हे एक मोठे नुकसान आहे. राशिद खान यांच्या निधनाच्या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की राशिद खान आता आपल्यात नाहीत.”

आणखी वाचा – “तर लोक तुम्हाला मान का देतील?”, मराठी कलाकारांना राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले “अद्या, फद्या, अंड्या बोलता अन्…”

राशिद खान हे रामपूर-सहस्वान घराण्यातील खान हे घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खान यांचे पणतू आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या ११ वर्षी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली होती. राशिद खान हे प्रामुख्याने शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध असले तरी, त्यांच्या फ्यूजन आणि चित्रपट गाण्यांना देखील भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी ‘माय नेम इज खान’, ‘राझ ३, ‘बापी बारी जा’, ‘कादंबरी’, ‘शादी में जरूर आना’, ‘मंटो’ आणि ‘मीटीन मास’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली आहेत.

आणखी वाचा – Video : महाबळेश्वरमध्ये शेतात कांदे, लसूण, बीट, टोमॅटो अन् इतर भाज्या पिकवते मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचाही आहे मळा, दिसली संपूर्ण झलक

दरम्यान, राशिद खान यांच्या निधनाने संगीत विश्वात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच राशिद खान यांच्या जाण्याने अनेकांना दु:ख झाले असून सोशल मीडियाद्वारे त्यांनी राशिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags: शास्त्रीय गायकराशिद खानbollywood newsbollywood singerpasses awayrashid khansinger
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Rupali Bhosale On Shri Ram Mandir

बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी अभिनेत्रीलाही राम मंदिर सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.