मराठी सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांच्या लग्नसोहळ्याने तर सोशल मीडियावर अक्षरशः धमाकूळ घातला. त्यानंतर अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची आडारकर यांच्या लग्नाच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला. अचानक लग्नाचे फोटो समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. याशिवाय अनेक कलाकार जोडपी आहेत ज्यांचा नुकताच साखरपुडा सोहळा झाला असून लवकरच ते विवबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, शुभंकर एकबोटे-अमृता बने या कलाकार जोड्या लवकरचं लगीनगाठ बांधणार आहेत. (Man udu udu zhala fame actor wedding)
यानंतर एका कलाकाराने लगीनगाठ बांधली असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. या अभिनेत्याच्याही लग्नाचे फोटो अचानक समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा अभिनेता म्हणजे विनम्र भाबल. ‘मन उडू उडू झालं’ या लोकप्रिय मालिकेतून विनम्र घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेली सत्तू ही भूमिका लोकप्रिय ठरली. विनम्रच शाही विवाहसोहळा ८ डिसेंबरला संपन्न झाला. पूजा असं त्याच्या बायकोचं नाव आहे.
विनम्रचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री हृता दुर्गुळेसह रिना मधुकर, पूर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब असे अनेक कलाकार विनम्रच्या लग्नदिवशी दिसले. तसेच काही कलाकारांनी विनम्रच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या.
विनम्रने कोणताच गाजावाजा न करता अगदी साधेपणाने त्यांचं लग्न उरकलं. आजवर विनम्रने साकारलेल्या मालिकांमधील भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या. मालिकांव्यतिरिक्त विनम्र नाटकांमधूनही झळकला. सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘राजू बन गया Zentalman’ या नाटकांत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या नाटकात विनम्रसह अंशुमन विचारे, उमेश जगताप, अमृता फडके हे कलाकारही पाहायला मिळत आहे.