सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं लग्न झालं नाही आहे पण…”, रिंकू राजगुरूला हवी आहे अशी सासू, खास व्यक्तीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 11, 2023 | 10:17 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rinku Rajguru New Pos

"माझं लग्न झालं नाही आहे पण…", रिंकू राजगुरूला हवी आहे अशी सासू, खास व्यक्तीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली…"माझं लग्न झालं नाही आहे पण…", रिंकू राजगुरूला हवी आहे अशी सासू, खास व्यक्तीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली…

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘झिम्मा २’ या चित्रपटाची. हिंदी बिग बजेट चित्रपट येऊनही हा चित्रपट अद्याप बॉक्सऑफिसवर हाऊसफुल असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या कथानकाने व चित्रपटातील कलाकारांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करत आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, अभिनेता सिद्धार्थ जाधव या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरतंय. (Rinku Rajguru New Post)

‘झिम्मा २’ मध्ये दोन चेहरे आले असल्याचं कळतंय. शिवानी सुर्वे व रिंकू राजगुरू ही दोन नवी पात्रे दिग्दर्शकाने चित्रपटात घेतली आहेत. मराठमोळ्या रिंकूने ‘सैराट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. ‘सैराट’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि या चित्रपटामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ मध्ये रिंकूने सुनेची भूमिका साकारली होती. रिंकू अभिनयासह सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. तिचे चाहते नेहमीच तिला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारताना दिसतात.

आणखी वाचा – ‘मन उडू उडू झालं’ फेम सत्तूचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न; अभिनेत्याच्या लग्नसोहळ्याला ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

अशातच सोशल मीडियावरून केलेल्या रिंकूच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपलं लग्न झालं नसलं तरी आपल्याला कशी सासू हवी आहे हे तिने या पोस्टमधून सांगितलं आहे. या पोस्टमध्ये तिने एका खास व्यक्तीचा फोटो शेअर केला असून आपल्याला अशीच सासू हवी आहे, असं लिहिलं आहे.अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याबरोबरचा फोटो रिंकूने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘माझं लग्न झालेलं नाही पण, सासू पाहिजेल तर अशी. उनो उनो उनो’ तिची ही पोस्ट चाहत्यांमध्ये सध्या बरीच व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा – ऋतुजा बागवेचा नायिका म्हणून पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठा खुलासा, म्हणाली, “मी घाबरत नाही पण…”

‘झिम्मा २’ या चित्रपटात निर्मिती व रिंकू यांची सासू- सुनेची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. त्यामुळे रिंकूने शेअर केलेल्या ‘अशी सासू हवी’ या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे.

Tags: entertainmentjhimma 2 moviejhmma 2marathi actressNirrmite Saawaantrinku rajgururinku rajguru post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Bobby Deol On Animal

"जे काही आहे ते पत्नीमुळेच…", 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशाचे श्रेय बायकोला देत बॉबी देओलने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "मी माझ्या वडिलांसारखा नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.