आदेश बांदेकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने लाखो दिलांवर राज्य केलं आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय. आदेश बांदेकर यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर व मुलगा सोहम बांदेकर यांचंही अभिनयक्षेत्रात वर्चस्व असलेलं पाहायला मिळतं. सोहम व सुचित्रा यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून उत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दरम्यान हे बांदेकर कुटुंबीय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. (Aadesh Bandekar Family Time)
सोशल मीडियावरून ते नेहमीच काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या फेसबुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आदेश बांदेकर यांनी फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेल्या कुटुंबासह वेळ घालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. याआधीही बांदेकर कुटुंबीय एकत्र वेळ घालवताना बरेचदा दिसले आहेत. मात्र ते पत्नीसह वा त्यांच्या लेकासह वेळ घालवताना दिसत नसून ते त्यांच्या नातवासह क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहेत.
आदेश यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्यांचा नातू राजवीरसह मजा-मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोहमने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला असल्याचं दिसतंय. याआधीही आदेश यांनी नातवासह अनेक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी राजवीरला खांद्यावर उचलून घेतलेलं पाहायला मिळालं. तर दुसऱ्या फोटोमध्ये ते नातवासह फूड एन्जॉय करताना दिसत आहेत.
आदेश यांनी त्यांचा नातवाला खांद्यावर उचलून धरलेलं पाहून सोहमने कमेंट यावर केलेली कमेंट लक्षवेधी होती. “हा आताच डोक्यावर बसला आहे. अजून काय बाकी आहे” असं सोहमने गमतीशीर अंदाजात म्हटलं होतं.