प्रेक्षकांचा त्यांच्या रोजच्या दैनंदिन कामातून मालिकांसाठी ठरावीक वेळ राखून ठेवलेला असतो.गृहिणींसाठी मालिका नक्कीच जवळचा विषय असतो. अनेक मालिका येतात आणि जातात, पण काही मालिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात.(Hruta Durgule Ajinkya Raut)
अशीच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.मालिकेच यश हे जितकं त्याच्या कथानकावरती अवलंबून असत, तितकच ते कलाकारानंवरही अवलंबुन असत.या मालिकेमधून ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही फ्रेश जोडी इंद्रजित आणि दीपिकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली.आणि बघता बघता ते प्रेक्षकांचे लाडके इंद्रा आणि दिपू झाले.
हॅशटॅग इंद्रदिप ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे.ऋता आणि अजिंक्यची ऑन स्क्रीन केमिस्ट्री तर छान होतीच पण त्याच सोबत त्यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग ही कमाल होत. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी आज ही या जोडीवर प्रेक्षकांचं तितकंच प्रेम आहे, मालिका संपल्या नंतर ऋता आणि अजिंक्य यांनी वैयक्तिक रित्या बरच काम केलं.आणि त्यांच्या या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढून अखेर ते दोघे भेटले.(Hruta Durgule Ajinkya Raut)

त्यांची ही भेट त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीटच आहे,ऋता आणि अजिंक्यने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्यांच्या या भेटीचे खास फोटो शेअर केले आहेत, त्या फोटोला त्यांनी आजची संध्याकाळ छान गेली, अखेर अनेक दिवसांनी का होईना आम्ही भेटलो.असं कॅप्शन दिल आहे. त्यांच्या या पोस्ट वर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.