मालिकाविश्वात काम करत असताना कलाकार मंडळींचाही स्ट्रगल हा सुरूच असतो. कथानकानुसार त्यांनाही वेगवेगळ्या ऑडिशन्सला जावं लागत, अशातच अभिनेत्री जुई गडकरी हिने दिलेल्या लूक टेस्टचा किस्सा तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेल्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतून सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सायलीच्या या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं.(Jui Gadkari Shares Incident)
जुईने एका लूकटेस्ट दरम्यानचा किस्सा नुकताच सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये जुईने बंगाली लुक मधील काही लक्षवेधी फोटोस पोस्ट केले आहेत. या खाली कॅप्शन देत जुईने म्हटलंय की, एका वर्षापूर्वी जुईने लूकटेस्ट दिली होती. बंगाली पात्राच्या भूमिकेसाठी तिने ही लुक टेस्ट दिल्याचं समोर आलं.
पाहा लूकटेस्ट दरम्यान नेमकं काय झालं (Jui Gadkari Shares Incident)
तसेच फोटो देखील तिने शेअर केले आहेत. मात्र जुईला ही बंगाली पात्राची भूमिका काही मिळाली नाही. कारण संबंधित प्रोजेक्ट्मधील लोकांना त्या पात्रासाठी चाळिशीतील बंगाली स्त्री हवी होती, त्यामुळे जुईला तो प्रोजेक्ट मिळाला नाही. जुईने हे बंगाली लूकमधील फोटोस शेअर केले असून ही भूमिका जरी मिळाली नसली तरी हा लुक तिला अतिशय आवडल्याचंही तिने म्हटलं आहे.(Jui Gadkari Shares Incident)
हे देखील वाचा – इंद्रा आणि दिपूची खास भेट
बंगाली पात्राच्या भूमिकेत जुई पाहायला नसली मिळाली तरी ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतेय. या मालिकेतील सायली आणि अर्जुन म्हणजेच जुई गडकरी आणि अमित भानुशाली ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. काही दिवसांपासून सायली अर्जुनची ही मालिका नंबर वन वर असून या मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय हाताळला जाताना दिसतोय, मात्र हा विषय बाजूला राहून आता सायली आणि अर्जुन यांच्यातील प्रेम फुलताना दिसतंय.