बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेचा विषय ठरते. कधी गाण्यांमुळे, कधी व्हायरल व्हिडीओमुळे तर कधी नवऱ्याबरोबर शेअर केलेल्या फोटोंमुळे नेहा सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा कोणताही अंदाज चाहत्यांना वेड लावतो. तिच्या फोटोंवरही चाहते भरभरून कमेंट करताना दिसतात. नेहा कक्करमुळे तिचा पती रोहनप्रीत सिंग चर्चेत येत असतो. यावेळी मात्र तो त्याच्या हटके टॅलेंटमुळे चर्चेत आला आहे. (Rohanpreet Singh Sing Marathi Song)
रोहनप्रीतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गायक रोहनप्रीत सिंगने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. “या गोड रीलसाठी धन्यवाद. शिवाय सगळ्यांचा मी आभारी आहे”, असं लिहित रोहनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहन ‘ढगाला लागली कळ’ हे मराठमोळं गाणं गाताना दिसत आहे. रोहनप्रीतने गायलेलं हे गाणं ऐकून उपस्थित चाहतावर्ग या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे.
रोहनप्रीत सिंगच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्यांचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. रोहनप्रीतच्या या व्हिडीओवर त्याची पत्नी नेहा कक्करनेही कमेंट केली आहे. नेहाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं आहे की, “मी स्वतः या क्षणाची साक्षीदार आहे. तुझी पत्नी असल्याचा मला खूप अभिमान आहे” असं म्हणत नवऱ्याचं कौतुक केलं आहे. तर नेहाचा भाऊ टोनी कक्करनेही कमेंट करत म्हटलं आहे की, “आताचा स्टार मराठी मुलगा” याशिवाय चाहत्यांनीही रोहनप्रीतच्या मराठीचं कौतुक केलं आहे.
रोहनप्रीतने शेअर केलेला हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या बदलापूर कॉन्सर्टमधील आहे. या कॉन्सर्टला रोहनप्रीतसह त्याची पत्नी नेहा कक्करने देखील हजेरी लावली होती. शिवाय सोनू निगम देखील या कॉन्सर्टला उपस्थित होता. नेहा व रोहनप्रीतने ९ ऑक्टोबर २०२० रोजी रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी शेअर केलेल्या फोटोनंतर त्याच्या लव्हस्टोरीची चर्चाही बी- टाऊनमध्ये होऊ लागली.