झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना?’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. तिच्या सहजसुंदर व निरागस अभिनयाने तिने लाखों प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. गौतमीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमँटीक पोज देत एक हटके फोटो शेअर केला आहे. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar On Instagram)
मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. प्रसाद-अमृता, सुरुची-पियुष, मुग्धा-प्रथमेश यांच्या पाठोपाठ गौतमीदेखील विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या मेहंदी लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. गौतमी व स्वानंद या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. गौतमीने हा फोटो शेअर करताच अल्पावधीतच या फोटोला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. गौतमीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीने तिच्या मेहंदी लूकसाठी गुलाबी, नारंगी व आकाशी रंगाचा खास नक्षीकाम केलेला लेहेंगा परिधान केला आहे. तसेच या लेहेंग्याला साजेसा असा सोनेरी रंगाचा नेकलेसही परधान केला आहे. त्याचबरोबर गौतमीचा होणारा नवरा स्वानंद याने गौतमीच्या लेहेंग्याला साजेसा असा कुर्ता परिधान केला आहे. स्वानंदने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा व त्यावर सुंदर नक्षीकाम असलेला गुलाबी रंगाचा जॅकेटही परिधान केला आहे.
आणखी वाचा – स्वानंदी व आशिषच्या लग्नाचा सजला मंडप, जय्यत तयारी सुरु, अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक
या गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे. तर स्वानंद ही त्या लूकमध्ये एकदम डॅशिंग दिसत आहे. गौतमी-स्वानंद यांचा हा खास मेहंदी लूकमधील फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमी या रिलेशनमुळे चांगलीच चर्चेत होती. अशातच आता या अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमुळे तिच्या अनेक चाहत्यांना लग्नाची चाहूल लागली आहे.