मनोरंजन विश्वात सध्या सर्वत्र लग्नांची धामधूम पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. अमृता-प्रसाद, सुरुची-पियुष यांच्यापाठोपाठ गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश हे दोघेदेखील नुकतेच लग्नबंधनात अडकले. अशातच आता गायिका-अभिनेत्री स्वानंदी टीकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाच्या तयारीलादेखील सुरवात झाली आहे. (Swanandi Tikekar On Instagram)
गेले काही दिवस स्वानंदी-आशिष यांच्या केळवणाची लगबग सुरू होती. त्यांच्या कुटुंबियांकडून व मित्रपरिवाराकडून केळवणाचे आयोजन केले गेल्याचे पाहायला मिळाले. याचे काही खास क्षण त्या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले होते. अशातच आता त्यांच्या लग्नाचीही जय्यत तयारी सुरु झाली आहे. स्वानंदीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे.
आणखी वाचा – ‘धर्मवीर’ फेम ‘या’ अभिनेत्याने घेतली नवीन गाडी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला…
स्वानंदीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नानिमित्त मंडप टाकण्याचे व सजावटीची तयारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये काही माणसं लग्नासाठी खास मंडप सजावट आहेत. तसेच फुलांची सजावट करतानाही दिसत आहेत. स्वानंदीने ‘प्रिपरेशन’ म्हणजेच ‘तयारी’ असा हॅशटॅग देत हा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. तर गायक आशिषनेसुद्धा त्याच्या तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “सासू माझी ढासू…”, हेमंत ढोमेच्या सासुला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा, लेक क्षिती जोगचा व्हिडीओही चर्चेत
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वानंदी-आशिष यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडादेखील संपन्न झाला आणि गेले काही दिवस ते लग्नाला किती दिवस बाकी आहेत हे सांगत होते. अशातच आता शेवटी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते या लग्नासाठी उत्सुक आहेत