शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भट मालदीवमध्ये नवऱ्याबरोबर घेत आहे सुट्ट्यांचा आनंद, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
maharashtrachi hasyajatra fame marath actress chetana bhat shared maldivs photos with her husband

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम चेतना भट मालदीवमध्ये नवऱ्याबरोबर घेत आहे सुट्ट्यांचा आनंद, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. यांपैकी एक विनोदी अभिनेत्री म्हणजे चेतना भट. चेतनाने आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिने या कार्यक्रमामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Chetana Bhat On Instagram)

चेतना भट ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंमधून ती नवऱ्याबरोबर बाहेर फिरायला गेली असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री तिच्या नवऱ्यासह मालदीवमध्ये गेले असून तिथली काही खास क्षण तिने इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. ‘मालदिव्सच्या आठवणी’ असं म्हणत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

View this post on Instagram

A post shared by Chetana Bhat (@bhatchetana)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अभिनेत्री तिच्या नवऱ्याबरोबर काही खास क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांबरोबर कमालीचे आनंदी दिसत आहेत. तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. वैशाली सामंत, इशाणी डे, सुमित लोंढे यांसह तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर छान, सुंदर, लय भारी, हॅप्पी वीकेण्ड” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, चेतनाचे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अनेक स्किट्स गाजले आहेत. त्याचबरोबर तिचा नवरा हादेखील याच क्षेत्राशी निगडीत आहे. त्याचे नाव मंदार चोळकर असं असून तो प्रसिद्ध गीतकार आहे. आजवर त्याने ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’, ‘गुरु’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.    

Tags: chetana bhatentertainment newsmaharashtrachi hasy jatramarathi actressmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death Case
Social

बेडरुममध्ये कॅमेरा, पत्नीबरोबर लाईट सुरु ठेवत शारीरिक संबंध अन्…; हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे काळे धंदे, संपूर्ण प्रकार उघड

मे 23, 2025 | 5:25 pm
Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Next Post
Mugdha Vaishampayan Mehendi

"आमचं ठरलं अन्…", मुग्धा वैशंपायनच्या मेहंदीसोहळ्यातील फोटो आले समोर, नवरीच्या हातावरील मेहंदीची होतेय चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.