Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : ‘माझा होशील ना’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. गौतमीने या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिका संपल्यानंतरही ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. सोशल मीडियावरही ती नेहमीच सक्रिय असते. गौतमी तिची बहीण मृण्मयीबरोबरचे अनेक फोटोस, व्हिडीओ शेअर करत असते. कायमच ही कलाविश्वातील बहिणींची जोडी लोकप्रिय ठरली आहे. अखेर आता गौतमीचं लग्नाच्या फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
कित्येक दिवसांपासून गौतमीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. स्वानंद तेंडुलकरबरोबर असलेल्या रिलेशनशिपमुळे गौतमी चर्चेत आली. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. गौतमीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो पहिल्यांदाच त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे औचित्य साधत शेअर केला आहे. गौतमीने स्वानंदबरोबर शेअर केलेल्या रोमँटिक फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अशातच मेहंदी समारंभासाठी तयार झाल्यानंतर गौतमी व स्वानंदचा एक रोमँटिक अंदाज समोर आला आहे. समोर आलेल्या या जोडप्याच्या व्हिडीओमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज विशेष लक्षवेधी ठरत आहे. गौतमी स्वानंदच्या प्रेमात आकंठ बुडालेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. गुलाबी रंगाच्या पेहरावात ही जोडी साऱ्यांच्या नजरा वळवून घेत आहे. एकमेकांना मिठीत घेत गौतमी व स्वानंदचा प्रेमळ अंदाज लक्षवेधी ठरत आहे.
मेहंदी सोहळ्यानिमित्त गौतमी व स्वानंदीची लगबग सुरु झालेली पाहायला मिळत आहे. गुलाबी रंगाच्या पेहरावाला साजेशी अशी गुलाबी रंगाची आकर्षक सजावट पाहणं रंजक ठरत आहे. या व्हिडीओतील नववधूवराचा लूकही खूप खास आहे. यानंतर आता साऱ्यांच्या नजरा गौतमी व स्वानंद यांच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत.