शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरवर उपचार घेताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘बिग बॉस’चे चित्रीकरण, हृदयस्पर्शी प्रसंग शेअर करत म्हणाले, “पायाला व पोटाला…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 13, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Mahesh Manjrekar shared his experience of shooting for Bigg Boss even while undergoing treatment for cancer

कॅन्सरवर उपचार घेताना महेश मांजरेकरांनी केले होते 'बिग बॉस'चे चित्रीकरण, हृदयस्पर्शी प्रसंग शेअर करत म्हणाले, "पायाला व पोटाला..."

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांना २०२१ मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांनी अत्यंत धीरानं या कॅन्सरशी लढा दिला आणि त्यावर मात केली. त्यांचा हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी होता. मात्र, या आजारपणातही त्यांनी बिग बॉस मराठी या शोच्या एका प्रोमोचे शूट केलं होतं आणि याचा अनुभव स्वत: महेश मांजरेकरांनी सांगितला आहे.

महेश मांजरेकर यांनी नुकतीच त्यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या नवीन  चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं महेश मांजरेकर आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या सोहळ्याला अभिनेते शरद पोंक्षे, महेश मांजरेकर व श्रेयस तळपदे हे एकत्र व्यासपीठावर बसलेले पाहून त्यांना एका पत्रकाराने त्यांच्या आजारपणातील लढ्याबद्दल प्रश्न विचारला.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

यावर महेश मांजरेकरांनी त्यांच्या कॅन्सरच्या आजारपणाबद्दल व त्या काळात त्यांनी केलेल्या शूटिंगचा अनुभवाबद्दल सांगताना असे म्हटले की, “तुम्ही मरेपर्यंत कायम जीवंत असता. त्यामुळे आपण आपले आयुष्यही अगदी तसंच जगलं पाहिजे. मला कॅन्सर झाल्याचे कळताच मी मरेन हा विचार कधी केलाच नाही. कॅन्सरच्या ऑपरेशननंतर मी ‘बिग बॉस’च्या प्रोमोचे शूट केले होते. तेव्हा मी माझ्या पायाला व पोटाला अक्षरश: पिशव्या (ट्यूबस) बांधून प्रोमोचे शूटिंग केले होते.”

आणखी वाचा – ‘भूल भुलैया ३’मध्ये कार्तिक आर्यन व विद्या बालनसह झळकणार माधुरी दीक्षित, साकारणार ‘ही’ खास भूमिका, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

यापुढे त्यांनी श्रेयस तळपदे व शरद पोंक्षे यांचेही कौतुक करत असं म्हटलं की, “शरदने त्याच्या कॅन्सरच्या ऑपरेशननंतर ‘हिमालयाची सावली’ का केलं? असं वाटलं. पण त्याने त्यांच्या हिंमतीवर ते केलं. श्रेयसनेही त्याच्या या आजारपणावर खंबीरपणे मात केली. त्यामुळे त्याच्या आजारपणाबद्दल जेव्हा मला कळलं. तेव्हा मी त्याला काहीही टेन्शन घेऊ नकोस असं म्हटलं होतं.”

आणखी वाचा – असा पार पडला मुग्धा वैशंपायनचा पदवी प्रदान सोहळा, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

‘बिग बॉस मराठी’ ३ चा सीझन सुरू होण्याआधीच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यातून बरे होत त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रोमो शूट केलं होतं. वेदना होत असूनही महेश यांनी चेहऱ्यावर त्या न दाखवता प्रोमो शूट केले आणि त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं होतं.      

Tags: entertainment newsmahesh manjrekarmarathi directormarathi entertainment newsMarathi newsमनोरंजन बातमीमराठी दिग्दर्शकमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमहेश मांजरेकर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Next Post
Ritesh deshmukh shared video

श्वानाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ पाहून रितेश देशमुख भडकला, प्रतिक्रिया देत म्हणाला, "तुरुंगात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.