२००७ साली प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैया’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यानंतर २०२२ साली या चित्रपटाचा दूसरा भाग चाहत्यांच्या भेटीला आला होता. हा चित्रपटही तूफान गाजला होता. अशातच आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच ‘भूल भुलैया ३’चीदेखील चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘भूल भुलैया’मध्ये अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री विद्या बालन हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यानंतर ‘भूल भुलैया २’मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनसह अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती.
अशातच ‘भूल भुलैया ३’ची घोषणा करण्यात आली असून यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन हे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कार्तिक आर्यन व विद्या बालन यांच्यासह या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितही झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित एका भुताच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
आणखी वाचा – शीना बोरा हत्याकांडावर आधारित वेब मालिकेची तारीख आली समोर, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?
माधुरी दीक्षितच्या एण्ट्रीद्वारे या चित्रपटात निर्मात्यांनी एक ट्विस्ट आणला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, यावेळी ‘रूह बाबाचा एक नाही, तर दोन भूतांबरोबर सामना होणार होणार आहे आणि हे दुसरे भूत माधुरी दीक्षित असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात चित्रपटातील माधुरीच्या एण्ट्रीबाबत अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण माधुरीच्या या चित्रपटातील एण्ट्रीने चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अक्षय कुमार या चित्रपटाचा भाग नसल्याचे सांगितले होते. अक्षय कुमार ‘भूल भुलैया ३’मध्ये नसला तरी अनीस त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. तसेच भूल भुलैया ३’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.