बरेचदा कस असत कलाकार दिग्दर्शक कितीही मोठा झाला तरी त्याला सुद्धा शाबासकीची कौतुकाची गरज असतेच. ती शाबासकीची थाप ही प्रत्येकाच्या पाठीवर मिळणं हे अत्यंत आवश्यक असत. बरं ही शाबासकी जर ग्यानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची असेल तर सोने पे सुहागा च म्हणायला हवं. असच काहीस घडलं होत अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या बाबत. लता दीदींसोबतचा एक किस्सा महेश कोठारे यांनी त्यांच्या डॅम इट आणि बरच काही या पुस्तकात सांगितला आहे.(Mahesh Kothare Lata Mangeshkar)
धुमधडाका’, ‘दे दणादण’ हे चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वतः फोन करून कोठारेंच अभिनंदन केलं होतं, “तुझे चित्रपट पाहते ह मी! छान बनवतोस तू!” असंही त्या कोठारेंना म्हणाल्या होत्या. ‘धडाकेबाज’नं मोठं यश मिळवल्यानंतर त्याच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला लतादीदींना आमंत्रण द्यायचं कोठारेंनी स्वतः ठरवलं होत. त्याप्रमाणे स्वतः कोठारे आणि अनिल मोहिले लतादीदींच्या ‘प्रभुकुंज निवासस्थानी त्यांना भेटायला गेले. याबाबतचा किस्सा सांगताना कोठारे यांनी लिहिलं आहे, ‘धडाकेबाज’च्या कार्यक्रमाची मी त्यांना कल्पना दिली.
पाहा काय म्हणाल्या होत्या लता दीदी कोठारे यांना (Mahesh Kothare Lata Mangeshkar)
सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांच्या नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही ठेवल्याचं सांगून त्यास तुम्ही उपस्थित राहिलात तर खूप आनंद वाटेल, असं मी म्हणालो. तेव्हा लतादीदींनी आपल्यासोबत मीनाताई, उषाताई आणि आशाताईदेखील या सोहळ्यास येतील, असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे लतादीदी ‘वेस्ट इन मधील रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास उपस्थित राहिल्या. आमच्या सगळ्या टीमचं त्यांनी ट्रॉफीज देऊन कौतुक केलं. तसेच या वेळी त्यांनी खूप छान भाषणही केलं. ट्रॉफीज वितरण समारंभानंतर त्यांनी भोजनाचासुद्धा आस्वाद घेतला.(Mahesh Kothare Lata Mangeshkar)
हे देखील वाचा – अलका कुबल ऐवजी ‘ही’ अभिनेत्री झळकणार होती माहेरची साडी चित्रपटात
‘धडाकेबाज’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात कोठारे यांनी पुढील दोन चित्रपटांची घोषणा केली. एकाचं नाव होतं ‘जिवलगा’ आणि दुसऱ्याचं नाव होतं ‘झपाटलेला.’ मुख्य सोहळा आटोपल्यानंतर कोठारे यांच्या लतादीदी यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या होत्या. याबाबत बोलताना कोठारे म्हणाले, मी केलेल्या ‘जिवलगा’ चित्रपटाच्या शीर्षकाचा उल्लेख त्यांना थोडा आश्चर्यकारक वाटला होता. ‘महेश, पाच अक्षरी शीर्षक हा तुझा हातखंडा आहे. तरीही तू तुझं शीर्षक चार अक्षरी का करतो आहेस? ‘तो जिवलगा’ किंवा ‘जिवलगा रे’ असं काहीतरी कर’ असं दीदींनी मला सुचवलं. तेव्हा मी दीदींना विचार करतो, असं म्हटलं देखील होते. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. त्या वेळी मी खूप हट्टी होतो. मला जे पटेल तेच मी करायचो. त्याप्रमाणे मी ‘जिवलगा’ हेच शीर्षक निश्चित केलं.
आपण एखादी कलाकृती डोक्यात ठेवून ती बनवण्याचा अट्टाहास करतो तेव्हा ती काल्कावृत्ती बनवण्यासाठी आपण फार संयमी आणि द्येयवादी असतो. महेश कोठारे हे दिग्दर्शनाच्या बाबतीत अगदीच चोख होते.
