शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी दिमाखात चालू आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांच्या सह अन्य कलाकारांच्या दमदार अभिनयाने तसेच भव्यदिव्य सेट, लक्षवेधी घोडाफेक यांसारख्या अनेक कलाकृतीं समृद्ध असं हे महानाट्य सध्या पिंपरी चिंचवड मध्ये सुरु आहे. पण या वेळी आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल अमोल कोल्हे यांनी महानाट्य संपल्या नंतर प्रेक्षकां समोर याबाबतची खदखद व्यक्त केली आहे.(Amol Kolhe threaten)
महानाट्याचा प्रयोग संपल्यावर मंचावर येत अमोल कोल्हे म्हणाले ‘ शेवटच्या रांगेपर्यंत ३०० रुपये देऊन तिकीट लहान लेकरांना काही आई वडील महानाट्य बघण्यासाठी आले पण इथले काही पोलीस अधिकारी फ्री पास मागत होते आणि नाही म्हणल्यावर बघू हे नाटक कस चालतंय ही धमकी सुद्दा देण्यात आली. पुढे अमोल कोल्हे म्हणाले कि नाशिक मधल्या प्रयोग दरम्यान स्वतः नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी तब्बल अडीच हजार पोलीस बांधवाना तिकीट काढून महानाट्य बघण्याचा लाभ दिला होता. इथे मात्र त्याच्या उलटच चालू आहे.
महाराष्ट्राच्या मातीत कला आणि राजकारण याचं एक वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे. पेशाने जरी राजकारणी तरी अभिनय क्षेत्रात सुद्दा अग्रेसर असणारे काही कलाकार दोन्ही गोष्टी अगदी लीलया पेलतात. यातलं एक नाव म्हणजे अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे सध्या शिवपुत्र संभाजी या त्यांच्या महानाट्या मध्ये सर्वत्र व्यस्त आहेत. प्रेक्षकांचाही या नाट्याला भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. तरीही या सर्वांमधून त्यांनी समाज प्रबोधनाचा त्यांचा वसा सोडला नाही.(Amol Kolhe threaten)
हे देखील वाचा –‘मराठी चित्रपट न चालण्यासाठी ही कारणं आहेत….’न चालणारे मराठी चित्रपट आणि लक्ष्या ने मांडलं होत परखड मत
अमोल कोल्हेंच इतिहासाप्रति छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रति असणारी आस्था, प्रेम हे जग जाहीर आहे त्यांच्या अभिनयातून, लेखणीतून त्यांनी वारंवार या गोष्टीची अनुभूती करून दिली आहे. तर काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावल. तर याच चित्रपटाचा पुढचा भाग शिवप्रताप स्वारी आग्रा हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आयेणार आहे याबाबतची माहिती त्यांनी दिली.