Deepika Padukone Gave A Fitting Reply Trolls : रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट चित्रपटगृहांत अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक प्रेक्षकाला त्याचे वेड लागलेले दिसते. चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गज या चित्रपटाचे भरभरुन कौतुक करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी चित्रपट, अभिनेते आणि दिग्दर्शकांबद्दल काही बोलले असताना, रणवीर सिंगची पत्नी दीपिका पदुकोणने अद्याप चित्रपटाबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही. रणवीरची पत्नी म्हणून दीपिकाच्या पाठिंब्याची लोकांना अपेक्षा होती आणि त्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली. आता दीपिकाने या टीकेला मोजक्या शब्दात चोख प्रत्युत्तर दिले आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत, जे नेहमीच प्रत्येक वळणावर एकमेकांसाठी उभे राहिलेले दिसतात.
नुकतेच एका पोस्टच्या माध्यमातून दीपिकावर निशाणा साधला असून दीपिका ५०० कोटींच्या बजेटच्या चित्रपटावर मौन पाळत असल्याचे सांगण्यात आले.
या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘धुरंधर 2’ जागतिक विक्रम मोडण्यात व्यस्त असताना, तिने चित्रपटाचा प्रीमियर सोडला आणि तिच्या सासऱ्यांसोबत सितार कॉन्सर्टमध्ये गेली. या चित्रपटासाठी किंवा रणवीरसाठी ना तिने काही पोस्ट केले, ना त्याची प्रशंसा केली, तिने फक्त मौन पाळले. यासोबतच इंटरनेटवर नाटक रचल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. आता या पोस्टवर दीपिकाच्या संयमाचा बांध फुटला असून तिने मोजक्याच शब्दांत सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा – ‘नॅशनल क्रश’चं टायटल चोरावंसं वाटेल…”, गिरीजा ओक स्पष्टच म्हणाली, “प्लिज चोरा, खरंच ही प्रसिद्धी…”

दीपिकाने कमेंट करत म्हटलं, “मित्रा… दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्यापैकी कुणीही पाहण्याच्या खूप आधी मी हा सिनेमा पाहिला आहे. आता सांग पाहू विनोद नेमका कोणावर आहे?”. दीपिकाने तिचे मत मांडले असताना अनेक लोक तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. एका यूजरने म्हटले, “तिला एकटे सोडा, ती सध्या तिच्या मुलीसोबत व्यस्त आहे”. दुसरा म्हणाला, “त्यांनी हे आधीच पाहिले असेल, त्यांच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करू नका”. बऱ्याच लोकांनी लिहिले आहे, “फक्त सोशल मीडियावर लिहून पाठिंबा दर्शविला जात नाही”. आणखी एक युजर म्हणाला, “तिला त्याची स्पॉटलाइट कमी करायची नाही आणि अशा प्रकारे ती त्याला सपोर्ट करत आहे”.





