बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड, इमोशन, ड्रामा आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 8, 2026 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ghabadkund Marathi Movie

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड, इमोशन, ड्रामा आणि…

Ghabadkund Marathi Movie : यवतमाळचा होतकरू आणि प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. विविध शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच ‘खिचिक’,‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रीतम पाटील यांनी ‘अल्याड पल्याड’च्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून थरारक अनुभव देण्याचा निर्धार केला आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या तंत्राचा आणि आशयाचा प्रयोग करणाऱ्या तरुण दिग्दर्शकांमध्ये प्रीतम पाटील यांचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन रहस्य, थरार आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित कथा सादर करण्याची त्यांची हातोटी लक्षवेधी ठरली आहे. ‘अल्याड पल्याड’ सारख्या रहस्यमय थरारपटातून त्यांनी मराठी सिनेमात कमी हाताळल्या जाणाऱ्या हॉरर-थ्रिलर प्रकाराला नवं रूप दिलं. मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि धाडसी सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून येतो. हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली असली, तरी मराठीत अशा प्रकारचा प्रयत्न अत्यंत दुर्मीळ आहे. प्रितम पाटील यांच्या संकल्पनेमुळे मराठी प्रेक्षकांना एक वेगळा, थरारक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध अनुभव मिळणार आहे.

आणखी वाचा – “15000 फॉलोवर्स गमावले…”, इंस्टाग्राम बंद होताच अभिनेत्रीची नवी सुरुवात, म्हणाली, “अनेक वेळा शुन्यापासून…”

View this post on Instagram

A post shared by Id Khushboo Paymode Yenare (@khushboopay1997)

भय, थरार आणि रहस्याचा जबरदस्त मिलाफ असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी एक खास ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीने लक्ष वेधणारे युवा दिग्दर्शक प्रीतम एस.के.पाटील सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा खूप समृद्ध आहे. निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच वेगळं काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करतात आणि ते समर्थपणे साकारही करतात. मात्र, मनोरंजनासोबत थरारक आणि मसालेदार अनुभवासाठी प्रेक्षक अनेकदा हिंदी चित्रपटांकडे वळताना दिसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी चित्रपटांना हॉररचा एक वेगळा तडका देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून हॉरर या जॉनरला हाताळताना अॅक्शन, इमोशन आणि ड्रामा यांचा संगम साधला आहे. एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजनाचं पॅकेज ठरेल, असा मला विश्वास आहे. ”

आणखी वाचा – ‘धुरंधर २’च्या यशावर दीपिका पदुकोणचे मौन का?, नेटकऱ्यांचा सवाल, उत्तर देत म्हणाली, “तुमच्यापैकी कुणीही…”

‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: ghabadkundmarathi moviepritam patil
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Digamber Naik Statement

"केदार शिंदे मिठी मारणार पण…", इंडस्ट्रीत काम न देण्यावरुन दिगंबर नाईक स्पष्टच बोलले, म्हणाले, "फरक नाही पडत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.