Surabhi Bhave New Instagram Account : कलाकार मंडळी सोशल मीडियावर जितके ऍक्टिव्ह असतात त्याची कालांतराने सर्वांनाच सवय होते. त्यांचे रुटीन, त्यांचे वैयक्तिक आयुष्य याबाबत ते नेहमीच काही ना काही शेअर करत असतात, आणि याची चाहत्यांना सवय होते. आणि अशातच अचानक जेव्हा या कलाकारांचं सोशल मीडिया अकाउंट दिसायचं बंद होतं तेव्हा मात्र काळजी वाटू लागते. काही दिवसांपूर्वीच लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेता विवेक सांगळेसोबत हा प्रकार घडला. त्याने लाखो फॉलोवर्स गमावले. त्यानंतर अभिनेत्याने पुन्हा नव्याने शून्यापासून सुरुवात करत सोशल मीडिया अकाउंट सुरु केलं. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीला याचा त्रास सहन करावा लागला. लोकप्रिय अभिनेत्रीने याची खंत व्यक्त करून दाखविली. आणि नव्या अकाउंटबाबत माहिती दिली. ही अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे.
सुरभीने आजवर अनेक मराठी मालिकांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘भाग्य दिले तू मला’, ‘स्वामीनी’, ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकांमधून सुरभीने महत्त्वपूर्ण भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केलं. मात्र सुरभीच अकाउंट २ आठवड्यांपूर्वी बंद झालं. काही तांत्रिक बिघाडामुळे हे घडलं असल्याचं समोर आलं. याबाबत अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत खंत व्यक्त केली आणि शून्यातून पुन्हा एकदा नवं अकाउंट सुरु केलं असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘नॅशनल क्रश’चं टायटल चोरावंसं वाटेल…”, गिरीजा ओक स्पष्टच म्हणाली, “प्लिज चोरा, खरंच ही प्रसिद्धी…”
व्हिडीओ शेअर करत सुरभी म्हणते, “नमस्कार मी सुरभी भावे काही तांत्रिक अडचणींमुळे माझं पूर्वीचं इन्स्टाग्राम अकाउंट हे बंद झालेलं आहे. त्यामुळे मी नव्या युजरनेमने दुसरं अकाउंट सुरु केलं आहे. पुन्हा एकदा नव्याने इन्स्टाग्रामच्या प्रवासाला सुरुवात… आयुष्यात आता सोशल मीडिया समजायला लागलं होतं आणि अचानक इन्स्टाग्रामने माझं अकाउंट पूर्ण बंद केलं. दोन आठवडे वाट पाहिली पण काहीच झालं नाही. १५००० फॉलोअर्स गमावले पण, हिंमत गमावली नाही. आयुष्यात अनेक वेळा शून्यापासून सुरु केलंय. त्यामुळे कशाला घाबरायचं असं म्हणून आज नव्याने इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केलं आहे. आधी जसं प्रेम केलंत, त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या नवीन अकाउंटवर कराल अशी खात्री आहे”.
आणखी वाचा – दयाबेनला पितृशोक, ८४ व्या वर्षी नाटककार भीम वाकाणी यांचे निधन, लेकीवर होता खूप जीव
हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत अभिनेत्रीने नव्या अकाउंटला फॉलो करायची विनंती केली आहे. तिने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “पुन्हा एकदा नव्याने इन्स्टाग्राम च्या प्रवासाला सुरुवात. आयुष्यात आता सोशल मीडिया कळायला लागलं होतं आणि अचानक इन्स्टाग्रामने माझं अकाउंट पूर्ण बंद केलं. दोन आठवडे वाट पाहिली पण काहीच झालं नाही. 15000 फॉलोवर्स गमावले पण हिंमत नाही गमावली. आयुष्यात अनेक वेळा शुन्यापासून सुरु केलं आहे सो कशाला घाबरायचं असं म्हणून आज नव्याने इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केलं आहे, आधी जसं प्रेम केलं त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या नवीन अकाउंटवर कराल अशी खात्री आहे. लिंक देत आहे नवीन अकाउंटची त्यावर नक्की follow करा”.





