Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : ‘बिग बॉस’ मराठी या रिऍलिटी शोमधून नावारूपाला आलेली अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुखची जोडी आज विवाहबंधनात अडकणार आहे. प्रसाद अमृताच्या शाही विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसाद अमृताचे लग्नापुर्वीचे ग्रहमख, हळदी, मेहंदी व संगीत सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले. शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) अमृता प्रसादचा हळदी समारंभ उरकल्यानंतर रात्री संगीत सोहळाही पार पडला.
अमृता-प्रसादच्या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवरून दोघांनी संगीत सोहळा गाजवला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दोघांनीही ‘मेरे मेहबूब, मेरे सनम’ या गाण्यावर डान्स केला असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी प्रसाद-अमृता यांनी एकमेकांचा हातात हात घेत डान्स केला, तसेच डान्सवेळी ते रोमँटिक झाल्याचं ही पाहायला मिळालं. प्रसाद -अमृताने त्यांच्या संगीत सोहळयाला धमाल केलेली पाहायला मिळत आहे.
तसेच या संगीत सेरेमनीमधील एक फोटो अमृता-प्रसादच्या फॅनपेजने पोस्ट केला आहे. अमृता -प्रसाद यामध्ये यांच्यातील फुलणार प्रेम पाहायला मिळालं. लेहेंगा घालून आलेल्या अमृताच्या शूजची लेस निघते तेव्हा प्रसाद गुडघ्यावर बसून तिच्या शूजची लेस बांधून देतो. यावेळी अमृता कमालीची लाजताना दिसत आहे. संगीत सेरेमनीसाठी अमृताने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर प्रसादने काळ्या रंगाचा शेरवानी सुट घातला होता.
याशिवाय प्रसाद-अमृताच्या हळदीचे तसेच मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हळदीनंतर दोघेही थिरकताना पाहायला मिळाले. पिवळ्या रंगाच्या लेहंगा आणि फुलांचे घातलेले दागिने यांत अमृता खूप सुंदर दिसत होती तर प्रसादनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. प्रसाद-अमृताच्या लग्नासाठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावली आहे. कलाकार मंडळींनीही प्रसाद-अमृताच्या लग्नात धमाल मस्ती केलेली पाहायला मिळत आहे.