‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अरुण कदम. अरुण त्यांच्या उत्तम विनोदी शैलीमुळे आज लोकप्रिय ठरले. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालतात. कामाबरोबरच सोशल मीडियावर ते अधिकाधिक सक्रिय असतात. खासगी आयुष्याबाबत प्रत्येक गोष्ट अरुण इन्स्टाग्रामद्वारे शेअर करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आजोबा झालो असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
काही दिवसांपूर्वीच अरुण यांची लेक सुकन्या आई झाली. सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला. कदम कुटुंबियांनी चिमुकल्याचं अगदी जंगी पद्धतीने स्वागत केलं. अरुण सध्या आजोबा असल्याच्या आनंद लुटत आहेत. त्याचबरोबरीने आता अरुण यांच्या नातवाच्या बारसाचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यांनी अगदी थाटामाटात नातवाचं बारसं केलं. अरुण यांनी अथांग असं नातवाचं नाव ठेवलं.
आणखी वाचा – वडील महेश भट्ट यांच्याबरोबर लिपलॉक करण्यावरून पहिल्यांदाच बोलली पूजा भट्ट, म्हणाली, “असं पुढेही…”
अरुण यांनी त्यांच्या नातवाच्या नामकरण विधीसाठी खास तयारी केली होती. उत्तम डेकोरेशन केलं. शिवाय यावेळी कदम कुटुंबियांच्या पारंपरिक लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एका व्हिडीओमध्ये अरुण त्यांच्या पत्नीसह नातवाला खेळवताना दिसत आहेत. तर सुकन्याही तिच्या कुटुंबियांबरोबर अगदी खुश दिसत आहेत. अरुण यांच्या पत्नीच्या लूकनेही विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – “तू मोठी झालीस पण…”, मिताली मयेकरच्या वडिलांची लेकीसाठी भावुक पोस्ट, म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी तू…”
याआधी गरोदरपणात अरुण यांनी लेकीचे सगळे लाड पुरवले. सोशल मीडियाद्वारे ते सुकन्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसतात. इतकंच नव्हे तर सुकन्याच्या डोहाळे जेवणाचीही जोरदार चर्चा रंगली होती. सुकन्याच्या डोहाळे जेवणाला अरुण कदम व त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार तयारी केली होती. तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी राजेशाही थाटात पार पडला. यावेळी अरुण कदम यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्यासारखा होता.