‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे विनोदी कलाकारांना एक वेगळीच ओळख मिळाली. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अरुण कदम. अरुण यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही त्यांनी मंचावर एण्ट्री करताच प्रेक्षक टाळ्या वाजवत आनंदी होतात. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात अरुण कदम यशस्वी ठरले. नेहमीच इतरांना आनंदी ठेवणारे अरुण कदम आज स्वतः एक वेगळाच आनंद सेलिब्रेट करत आहेत. यामागचं कारण म्हणजे ते आजोबा झाले आहेत.
अरुण कदम यांची लेक सुकन्या आई झाली आहे. कदम कुटुंबियांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या सुकन्याचं कुटुंब व कदम कुटुंबीय हा आनंद सेलिब्रेट करण्यात व्यग्र झाले आहेत. घरी चिमुकल्याचं आगमन करण्यासाठी सगळ्यांची धावपळ आणि जोरदार तयारी सुरु आहे.
आणखी वाचा – “आपल्या कामाची दखल…”, ‘चला हवा येऊ द्या’मधील ‘त्या’ व्यक्तीचं अभिषेक बच्चकडून कौतुक, म्हणाला, “तू हे…”
याआधी गरोदरपणात अरुण यांनी लेकीचे सगळे लाड पुरवले. सोशल मीडियाद्वारे ते सुकन्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसतात. इतकंच नव्हे तर सुकन्याच्या डोहाळे जेवणाचीही जोरदार चर्चा रंगली होती. सुकन्याच्या डोहाळे जेवणाला अरुण कदम व त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार तयारी केली होती. तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी राजेशाही थाटात पार पडला. यावेळी अरुण कदम यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्यासारखा होता.
अरुण यांची पत्नी वैशाली यांनीही डोहाळे जेवणाला विशेष तयारी केली होती. तसेच सगळ्यांनीच या कार्यक्रमासाठी खास लूक केले होते. २०२१मध्ये सुकन्या व सागरचा विवाहसोहळा पार पडला. सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे. तसेच ती भरतनाट्यमही शिकली आहे. वडिलांसह अनेक रिल व्हिडीओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते.