कलाक्षेत्रामध्ये अगदी तरुण वयात जगाचा निरोप घेणाऱ्या कलाकारांमध्ये आता वाढ झाली आहे. कलाक्षेत्रासाठीही ही अगदी दुःखद बाब आहे. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. सुप्रिसद्ध दाक्षिणात्या अभिनेता पवन सिंहचं निधन झालं आहे. तो फक्त २५ वर्षांचा होता. पवनच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे पवनचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मुंबईमधील राहत्या घरी पवनने अखेरचा श्वास घेतला. तो कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्याचा रहिवाशी होता. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, पवनचं पार्थिव मांड्या येथील त्याच्या घरी नेण्यात येणार आहे. त्याचे काही कुटुंबीय कर्नाटकमध्येच आहेत. त्यांच्या उपस्थितीतीच पवनच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
आणखी वाचा – Video : “पुरुषांवर संस्कार…”, सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा मुलगा शिकतोय स्वयंपाक, बनवली चपाती
कामानिमित्त पवन त्याच्या कुटुंबियांना घेऊन मुंबईमध्ये राहत होता. त्याने आजवर हिंदी तसेच तमिळ मालिकांमध्ये काम केलं आहे. अगदी तरुण वयामध्ये पवनला मृत्यूने गाठल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्रासह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे पवनचं निधन झालं असल्याची माहिती आहे. पण याशिवाय इतर कोणत्याच गोष्टीबाबत पवनच्या कुटुंबियांकडून माहिती देण्यात आलेली नाही.
बऱ्याच राजकीय मंडळींनी पवनला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच चाहत्यांकडूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारेही पवनचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. पवनच्या आधी दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नी स्पंदनाचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर विजय कोलमडून गेला आहे. आता पवनच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हादरली आहे.