शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहकलाकारांनी लग्नावरुन पृथ्वीक प्रतापची घेतली फिरकी, मोलाचे सल्ले, थट्टा-मस्करी अन्…; म्हणाला, “लग्न केल्यानंतरच…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 4, 2024 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Shyamsundar Rajput, Dattu More and Viraj Jagtap make fun with Prithvik Pratap for his new marriage

श्यामसुंदर राजपूत, दत्तू मोरे व विराज जगताप यांनी पृथ्वीक प्रतापची घेतली फिरकी, नवीन लग्नावरुन केली मस्करी

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज-नामवंतांचाही समावेश आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची नवी पर्वे, त्यातले नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन होत असतं..तब्बल सहा वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Shyamsundar Rajput Dattu More Viraj Jagtap fun with Prithvik Pratap)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, याच निमित्ताने इट्स मज्जाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या काही कलाकारांबरोबर खास गप्पा मारल्या. यावेळी पृथ्वीक प्रताप, श्यामसुंदर राजपूत, दत्तू मोरे व विराज जगताप हे कलाकार उपस्थित होते. यावेळी श्यामसुंदर राजपूत, दत्तू मोरे व विराज जगताप यांनी मिळून पृथ्वीकची मस्ती केली. अभिनेता पृथ्वीक प्रताप नुकताच विवाहबंधनात अडकला असून त्याच्या या नवीन लग्नानिमित्त इतरांनी त्याची मस्करी केली.

आणखी वाचा – भुवनेश्वरीचं सत्य समोर आणण्याचा अक्षराचा अजुनही प्रयत्न, अधिपतीला जाळ्यात ओढण्यासाठी आईचा नवा डाव, गोंधळ उडणार

पृथ्वीकला त्याच्या नवीन लग्नाबद्दल विचारले असता. तो विषयाला बगल देत कार्यक्रमाच्या नवीन सीझनबद्दल बोलत होता. यावेळी श्यामसुंदर हे त्याच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणत त्याला वारंवार लग्नाबद्दल विचारतो. डब्बा खाल्ला का? कधी येणार? शूट संपलं की थांबू नका, किती रागवता? असे एक आणि अनेक प्रश्न त्याला विचारतात. यानंतर पृथ्वीक शेवटी वैतागतो आणि म्हणतो की, “हेच आहे नवीन पर्व, कारण आहे जुनं सर्व”.

आणखी वाचा – डिसेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना, येत्या वीकेण्डला प्रदर्शित होणार ‘या’ सीरिज अन् ‘हे’ चित्रपट, जाणून घ्या…

तसंच यापुढे तो असंही म्हणतो की, “लग्न केल्यानंतरच जबाबदाऱ्या वाढतात असं नाही, नवीन सीझन आल्यानंतरही काही जबादाऱ्या वाढतात. नवीन सीझनमध्ये काही चांगला विनोद नाही केला तर घरी जाऊन दोनच्या ऐवजी तीन माणसं आहेत, शिव्या घालायला”. दरम्यान, पृथ्वीक प्रतापने २५ ऑक्टोबर दिवशी त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या प्राजक्ता वायकुळशी लग्नगाठ बांधली. दोघांचा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.      

Tags: maharashtrachi hasyajatraprithvik pratappruthvik pratap hasyajatra
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
paaru serial new promo

Paaru Marathi Serial : आदित्यने होणाऱ्या बायकोसमोर पारूला म्हटलं घरातील कामवाली, नोकर म्हणून हिणावलं, ते ऐकून प्रेक्षकांचाही संताप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.