सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज-नामवंतांचाही समावेश आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची नवी पर्वे, त्यातले नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन होत असतं..तब्बल सहा वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Shyamsundar Rajput Dattu More Viraj Jagtap fun with Prithvik Pratap)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, याच निमित्ताने इट्स मज्जाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या काही कलाकारांबरोबर खास गप्पा मारल्या. यावेळी पृथ्वीक प्रताप, श्यामसुंदर राजपूत, दत्तू मोरे व विराज जगताप हे कलाकार उपस्थित होते. यावेळी श्यामसुंदर राजपूत, दत्तू मोरे व विराज जगताप यांनी मिळून पृथ्वीकची मस्ती केली. अभिनेता पृथ्वीक प्रताप नुकताच विवाहबंधनात अडकला असून त्याच्या या नवीन लग्नानिमित्त इतरांनी त्याची मस्करी केली.
पृथ्वीकला त्याच्या नवीन लग्नाबद्दल विचारले असता. तो विषयाला बगल देत कार्यक्रमाच्या नवीन सीझनबद्दल बोलत होता. यावेळी श्यामसुंदर हे त्याच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणत त्याला वारंवार लग्नाबद्दल विचारतो. डब्बा खाल्ला का? कधी येणार? शूट संपलं की थांबू नका, किती रागवता? असे एक आणि अनेक प्रश्न त्याला विचारतात. यानंतर पृथ्वीक शेवटी वैतागतो आणि म्हणतो की, “हेच आहे नवीन पर्व, कारण आहे जुनं सर्व”.
तसंच यापुढे तो असंही म्हणतो की, “लग्न केल्यानंतरच जबाबदाऱ्या वाढतात असं नाही, नवीन सीझन आल्यानंतरही काही जबादाऱ्या वाढतात. नवीन सीझनमध्ये काही चांगला विनोद नाही केला तर घरी जाऊन दोनच्या ऐवजी तीन माणसं आहेत, शिव्या घालायला”. दरम्यान, पृथ्वीक प्रतापने २५ ऑक्टोबर दिवशी त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या प्राजक्ता वायकुळशी लग्नगाठ बांधली. दोघांचा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.