‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरु असल्याचे पाहायला मिळत होतं. चंचलाकडून अक्षराला भुवनेश्वरी तिच्या गैरहजेरीत लग्न लावणार असल्याचे कळलं. त्यामुळे अक्षरा चारुहास व चारुलता (भुवनेश्वरी) यांचा लग्न थांबवण्याचा निर्णय घेते आणि यासाठी ती हॉस्पिटलमधून पळ काढते. त्यानंतर अक्षरा थेट घरी येते आणि चारुहास व चारुलता यांचे लग्न मोडते. यामुळे आता ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आली आहे. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)
अक्षरामुळे भुवनेश्वरीच चारुलता आहे, हे सत्य सर्वांसमोर उघड होतं. त्यानंतरही भुवनेश्वरी स्वत:चा बचाव करते. “माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली. तुम्ही झिडकारलंत तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले,” असं ती चारुहासला म्हणते. यानंतर अधिपती “जे झालं ते झालं, आता सगळं विसरुन माफ करुया. तुमच्या मुलासाठी तरी हे लग्न मान्य करा” असं म्हणत चारुहासला हे लग्न करण्यासाठी विनवणी करतो.
आणखी वाचा – २४ तासांपासून बेपत्ता सुनील पाल अखेर सापडले, पोलिसांनी दिली माहिती, नक्की कुठे गायब होते?
त्यानंतर आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बजरंग अक्षराला भुवनेश्वरीविरुद्ध जबानी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अक्षरा त्याला असं म्हणते की, “तू न घाबरता जे काय आहे ते सांग”. त्यावर बजरंग असं म्हणतो की, “भुवनेश्वरी मॅडमनेच मला जेलबाहेर काढलं. त्यांनी मला जे जे सांगितलं, ते मी करत गेलो”. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीसमोर या घरात न राहता वृद्धाश्रमात जाण्याबद्दल सांगते. त्यावर अधिपती तिला “तुम्ही कुठे जाऊ नका” असं म्हणतो.
त्यामूळे आता एकीकडे अक्षरा बजरंगच्या मदतीने भुवनेश्वरीचं सत्य समोर आणणार आहे? तर एकीकडे अधिपती पुन्हा एकदा भुवनेश्वरीच्या जाळ्यात सापडणार आहे? त्यामुळे आता भुवनेश्वरीमुळे अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काही दुरावा येणार का? अधिपती बायको आणि आई यापैकी नक्की कुणावर विश्वास ठेवणार? हे प्रेक्षकांना आगामी भागातून पाहायला मिळणार आहे.