डिसेंबर महिन्यात अनेक वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तुम्ही घरबसल्या सुट्टीत या चित्रपट आणि सीरिजचा आनंद घेऊ शकता. यंदा अनेक बॉक्स ऑफिसवर गाजलेले चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक चांगलीच प्रर्वणी आहे. डिसेंबर महिन्यात आलिया भट्ट, प्रतीक गांधी, बॉबी देओल यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. डिसेंबरमध्ये येणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजविषयी चला जाणून घेऊया… (December OTT Release)
जिगरा : अभिनेत्री आलिया भटचा यावर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ‘जिगरा’. भावा-बहिणीच्या नात्यावर हा चित्रपट आधारीत होता. हा चित्रपट थिएटरमध्ये इतका चालला नाही. त्यामुळे आता येत्या ६ डिसेंबरला ‘जिगरा’ नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.
अग्नी : फरहान अख्तर निर्मित ‘अग्नी’ चित्रपटात अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची करुण कहाणी दिसणार आहे. हा चित्रपटही ६ डिसेंबरला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्रदर्शित होणार आहे. यात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, द्विवेंदू शर्मा, प्रतीक गांधी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.
तणाव सीझन २ : सोनी लिव्ह या ओटीटी माध्यमावर गाजलेली वेबसीरिज म्हणजे ‘तनाव’ याच गाजलेल्या वेबसीरिजचा पुढील सीझन अर्थात ‘तणाव सीझन २’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. कबीर बेदी, मानव वीज, रजत कपूर या कलाकारांची वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहे. ६ डिसेंबरला ही सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
माईरी : मराठमोळी अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता चिन्मय मांडलेकर, सई देवधर या मराठी कलाकारांची भूमिका असलेला ‘माईरी’ चित्रपटदेखील येत्या ६ डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.
अमरन : साई पल्लवी आणि अभिनेता शिवकार्तिकेयन यांचा सत्य घटनेवर आधारीत चित्रपट म्हणजे ‘अमरन’. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसनंतर आता येत्या ५ डिसेंबरला चित्रपट नेटफ्लिक्सवर या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.