Rohit Mane New Car : बरेच असे कलाकार आहेत जे त्यांचं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत येतात. मुंबईत येऊन स्वतःचं करिअर करणं, राहण्याची सोय नसतानाही वाटेल ते काम करुन एखादा निवारा शोधणं. आणि स्ट्रगल सुरु असताना मुंबईत घर घेणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. बरं, हे स्वप्न अनेक कलाकारांनी पूर्ण केलेलंही पाहायला मिळत आहे. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी नवं कोरं घर घेतलं असल्याची गुडन्यूज दिली. हा अभिनेता म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित माने. रोहित मानेने काही दिवसांपूर्वीच मुंबईत त्याच घर घेतलं आणि यापाठोपाठ आता त्याने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेरा केली आहे.
घर घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रोहितने नवी कोरी गाडी घेतली असल्याचं समोर आलं आहे. या नव्या गाडीबरोबरचा व्हिडीओ शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी” असं हटके कॅप्शन देत त्या त्याच्या नव्या गाडीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्यासह त्याचं संपूर्ण कुटुंब गाडी खरेदी कण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. रोहितने बायकोसह या नव्या थारची पूजा केली आणि त्यानंतर गाडीसह फोटोशूट केलं. तसेच अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी देखील या नव्या गाडीची पूजा केली. या स्वप्नपूर्तीचा आनंद रोहित आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
आणखी वाचा – तब्बल १० वर्षांनंतर कार्तिक आर्यनने मिळवली अभियांत्रिकीची पदवी, विद्यापीठातील हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर
नव्या महागड्या आणि आलिशान गाडीबरोबर अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पृथ्वीक प्रताप, स्नेहल शिदम, नम्रता प्रधान निखिल बने, प्रियदर्शिनी इंदलकर, चेतना भट, वनिता खरात, चेतन गुरव, ऋजुता देशमुख या कलाकारांनी रोहितच्या व्हिडीओवर कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी सुद्धा या नव्या गाडीसाठी रोहितचं भरभरुन कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – शाहरुख-सलमानच्या सुरक्षा रक्षकांचा नेमका पगार किती?, ‘त्या’ व्यक्तीकडून मोठा खुलासा, म्हणाला, “१.२ कोटी…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून रोहित माने घराघरांत पोहोचला. या कार्यक्रमामुळे रोहितला सावत्या म्हणून लोकप्रियता मिळाली. इतकंच नव्हे तर रोहित चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसला. रोहितचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.