paaru serial update : ‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. या मालिकांमधील ‘पारू’ या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेत सध्या एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. पारूवर खूप मोठं संकट ओढावलेलं पाहायला मिळत आहे. आदित्य व पारू एकत्र येऊ नयेत यासाठी अनुष्का नवनवन डाव आखताना दिसत आहे. शिवाय अनुष्का किर्लोस्कर कुटुंबाला नेस्तनाबूत करायला आली आहे. अनुष्का किर्लोस्कर कुटुंबात येऊन पारूला अहिल्यादेवींच्या नजरेतून पाडायची काम करत आहे. आणि हलक्या कानांच्या या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनी अनुष्काच्या हो ला हो देत पारूला बोल लगावले आहेत.
सध्या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू तिच्या गावाकडे कायमची निघून गेली आहे. पारू व गणी त्यांच्या गावी गेले असल्याचं अनुष्का आदित्यला सांगते. हे ऐकून आदित्यला खूप मोठा धक्का बसतो. अनुष्का आदित्यच्या आयुष्यात आल्याने आणि अहिल्यादेवी सतत पारूबाबत चुकीचा विचार करत असल्याने पारू त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेते. आणि या सगळ्याला अनुष्का कारणीभूत असते. आता मालिका खूप मोठ्या रंजक वळणावर आली आहे. अशातच या मालिकेतील कलाकार आता ‘झी मराठी’ वाहिनीच्या एका कार्यक्रमात एकत्र आले होते.
‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मकरसंक्रांत स्पेशल कार्यक्रमासाठी कलाकार एकत्र जमलेले दिसत होते. यावेळी एक कोर्ट असून येथे कुशल बद्रिके व श्रेया बुगडे हे कोर्ट चालवताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला कुशल बद्रिके असं म्हणत आहे की, “मी सगळ्या सासूच्या बाजूने आहे. तर याउलट श्रेया बुगडे सूनांच्या बाजूने असणार आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एका बाजूला पारू, शिवा, सावली, तुळजा उभा आहेत. तर दुसऱीकडे अहिल्यादेवी आहे. श्रेया अहिल्यादेवींना कोर्टात बोलवून विचारते, “अहिल्यादेवी तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्विकारणार आहात?”.
आणखी वाचा – तब्बल १० वर्षांनंतर कार्तिक आर्यनने मिळवली अभियांत्रिकीची पदवी, विद्यापीठातील हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर
श्रेयाच्या प्रश्नावर अहिल्यादेवी म्हणते की, “पारूला मी आदित्यची बायको म्हणून स्विकारु शकत नाही”. त्यावर कुशल बद्रिके म्हणतो, “ऑब्जेक्शन. पारू ही आदित्यची बायको होऊच शकत नाही”, असे म्हणून पुढे तो ‘पारू गो पारू’ हे गाणे म्हणायला सुरुवात करतो. त्यांनतर सर्वजण खळखळून हसताना दिसत आहेत.