रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तब्बल १० वर्षांनंतर कार्तिक आर्यनने मिळवली अभियांत्रिकीची पदवी, विद्यापीठातील हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 12, 2025 | 8:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kartik Aaryan Gets His Engineering Degree 

तब्बल १० वर्षांनंतर कार्तिक आर्यनने मिळवली अभियांत्रिकीची पदवी, विद्यापीठातील हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

Kartik Aaryan Gets His Engineering Degree  : अभिनेता कार्तिक आर्यनची गणना आज बॉलीवूडमधील टॉप कलाकारांमध्ये केली जाते, पण तो हे स्थान मिळवू शकेल असे त्याला स्वतःला कधीच वाटले नव्हते. अभिनेता होण्यापूर्वी कार्तिक आर्यन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता पण इंजिनियर होण्याऐवजी तो चित्रपटसृष्टीत आला. आता कार्तिकला जेव्हा १० वर्षांनी इंजिनीअरिंगची पदवी मिळाली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. अभिनेता नुकताच मुंबईच्या डीवाय पाटील विद्यापीठात गेला, जिथे त्याचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी अभिनेत्याचे भरपूर कौतुक आणि सन्मान करण्यात आला.

कार्तिक आर्यनला तब्बल १० वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली, ज्याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकच्या चेहऱ्यावर इंजिनिअर झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून अनेक कमेंटचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करताना कार्तिकने लिहिले की, “कॉलेजमध्ये मी मागच्या बेंचवर बसायचो. मी बॅकबेंचर होतो आणि आज मी दीक्षांत समारंभात मंचावर उभा आहे. मी किती आश्चर्यकारक प्रवास केला आहे. कॉलेजने मला खूप सुंदर आठवणी दिल्या, स्वप्ने दिलीस आणि आता शेवटी मला माझी पदवी मिळाली आहे. मला ही पदवी १० वर्षांनी मिळाली”.

आणखी वाचा – “हृदयविकाराचा झटका नाही तर ब्रेन स्ट्रोक”, टिकू तलसानियांच्या तब्येतीविषयी पत्नीची मोठी माहिती, म्हणाल्या, “रात्री आठ वाजता…”

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिकने पोस्टमध्ये सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे आभार मानले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कार्तिकला दिलेल्या प्रेमाने त्याचे मन प्रसन्न झाले आणि घरी आल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. कार्तिक आर्यननेही विद्यार्थ्यांबरोबर डान्स केला. कार्तिक आर्यनच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.

आणखी वाचा – शाहरुख-सलमानच्या सुरक्षा रक्षकांचा नेमका पगार किती?, ‘त्या’ व्यक्तीकडून मोठा खुलासा, म्हणाला, “१.२ कोटी…”

कार्तिकच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलायचे तर कार्तिक आर्यन २०२४ साली ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटामध्ये दिसला होता, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता बातमी आहे की तो अनुराग बासूच्या नव्या चित्रपटात सारा अली खानबरोबर दिसणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा असेल. मात्र, अद्याप चित्रपट किंवा कलाकारांची घोषणा करण्यात आलेली नाही.

Tags: bollywood newsKartik Aaryan Gets His Engineering Degreekartik aryan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Rohit Mane New Car

आधी घर अन् आता आलिशान कार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सावत्याची स्वप्नपूर्ती, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.