मराठी सिनेविश्वात कलाकार मंडळी काम करताना त्यांच्या घरच्यांनाही कलाकारामुळे ओळखले जाते. एखाद्या कलाकाराची आई वा बाबा अशी त्यांची कालांतराने ओळख होते. या कलाकारांच्या कुटुंबियांसाठीही ही विशेष ओळख कौतुकास्पद असते. एखाद्या कलाकाराची आई म्हणून झालेला सत्कार हा फार कमीवेळा कानावर पडतो. अशातच एका मराठमोळ्या कलाकाराची आई म्हणून तिचा झालेला सत्कार सध्या लक्ष वेधून घेत आहे. हा अभिनेता म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. (Nikhil Bane Post)
‘भांडुपचा शशी कपूर’ अशी आपली वेगळी ओळख मिळवत निखिल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे निखिल बने. आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा निखिल सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व त्याच्या कामानिमित्त काही माहिती शेअर करत असतो. सोशल मीडियावरील त्याच्या सक्रियतेमुळे व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे.
आणखी वाचा – आबासाहेब व अहिल्यादेवींच्या नात्यातील दुरावा येणार का समोर?, पारूच्या जीवालाही धोका अन्…
अशातच निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निखिलने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत एका कलाकाराची आई म्हणून त्याच्या आईच्या झालेल्या सत्काराबाबत पोस्ट शेअर केली आहे. निखिलने इन्स्टाग्राम द्वारे पोस्ट शेअर करत त्याच्या आईचा या सत्कार समारंभाला जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी या खास सोहळ्याला जाताना तयारी करतानाचा त्याच्या आईचा खास व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत निखिलने, “माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे कारण कला क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे कलाकाराची आई म्हणून माझ्या आईचा सत्कार करण्यात आला तिच्या आयुष्यातला मोठा दिवस. सावली फाऊंडेशन आणि गणेश जाधव यांचे खूप आभार”, असं म्हणत त्याने हा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत निखिलचे व तिच्या आईचे भरभरुन कौतुक केले आहे.