गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi चे विजेते होताच सूरज-अभिजीत गणपती चरणी, सिद्धीविनायकाचे घेतलं दर्शन, ‘त्या’ कृतीचे होतंय कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 8, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi contestants Suraj Chavan and Abhijeet Sawant visited Siddhivinayak temple in Mumbai took darshan Ganpati Bappa.

Bigg Boss Marathi चा विजेते होताच सूरज-अभिजीत मुंबईच्या सिद्धीविनायक गणपतीच्या चरणी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच संपला असून या सीझनचा भव्य ग्रँड प्रीमियर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. १०० दिवसांऐवजी या शोने अवघ्या ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांची भरभरून मनोरंजण केलं. बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीपर्यंत एकूण सहा जणांनी सहभाग घेतला होता. यापैकी सूरज व अभिजीत यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि सूरजने या शोचे विजेतेपद पटकावले. सूरज हा या शोचा विजेता झाला असून अभिजीत उपविजेता ठरला. त्यामुळे दोघांवर सध्या शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच या दोघांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. (Suraj and Abhijeet visited Siddhivinayak)

काल (७ ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर सूरज व अभिजीत यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी सूरजने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवली. यावेळी सूरजने “गणपती बाप्पा मोरया”, “जय श्रीराम” असा जयघोषही केला. दोघांच्या या दर्शन घेतानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूरज व अभिजीत यांच्या चाहत्यांनीही या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच सूरज व अभिजीत यांच्या या कृतीचे कौतूकही होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : “दाजी एकदम भारी…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सूरजचं भाष्य, बहीण-भावाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

सूरजची गणपती बाप्पावर श्रद्धा आहे हे सर्वांनीच पाहिले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात साजरा झालेल्या गणेशोत्सवात सूरजने गणपती बाप्पाला मोदक दिला होता. तसंच तो गणपती बाप्पाला आपला भाऊ मनात असल्याचेही त्याने सांगितले होते. अशातच त्याने सिद्धिविनाकाचे दर्शन घेतलं असून याचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.  सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे.

आणखी वाचा – “झापुक झुपूक काम आणि…”, सूरज चव्हाणचं आर्याने केलं भरभरुन कौतुक, म्हणाली, “माझ्या भावाने…”

दरम्यान, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे टॉप-६ सदस्य होते. यामध्ये सर्वात आधी जान्हवी किल्लेकरने ९ लाखांची सुटकेस घेऊन खेळ सोडला. त्यानंतर अंकिता, धनंजय आणि निक्की असे अनुक्रमे हे सदस्य नॉमिनेट झाले. अखेरीस सूरजने बाजी मारून ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हाती घेतली.

Tags: abhijeet sawantSuraj and Abhijeet took darshan Ganpati BappaSuraj and Abhijeet visited SiddhivinayakSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Paaru Marathi Serial Update

आबासाहेब व अहिल्यादेवींच्या नात्यातील दुरावा येणार का समोर?, पारूच्या जीवालाही धोका अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.