मराठी मालिकाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे बरेचदा ट्रोलिंगला सामोरे जाताना दिसतात. अनेक अशी कलाकार मंडळी आहेत जी या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात तर काही अशी मंडळी आहेत जी या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर देताना असतात. कलाकार व ट्रोलिंग हे एक समीकरणचं झालं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच सिनेसृष्टीतील एक जोडी ही नेहमीच ट्रोलिंगची शिकार झाली आहे, ती म्हणजे नारकर कपल. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून या दोघांना ओळखलं जातं. (Aishwarya Narkar Answer to Trollers)
आजवर ऐश्वर्या व अविनाश यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय ही जोडी लोकप्रिय गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. या दोघांच्या डान्स व्हिडीओवर मिलियनच्या घरात व्ह्यूज येतात असं जरी असलं, तरीही अनेकदा या जोडप्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मराठीपासून, बॉलीवूड ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाण्यांवर जबरदस्त डान्स व्हिडीओ बनवत असतात. त्यांच्या डान्सचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं.
आणखी वाचा – “एक्स गर्लफ्रेंडकडे पुन्हा जाणार सूरज चव्हाण?”, प्रश्न विचारताच म्हणाला, “माझ्या बच्चाला…”
अशातच नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर अंबाबाईचा गोंधळ या गाण्यावर ठेका धरला आहे. नवरात्रोत्सवात अविनाश व ऐश्वर्या यांनी पारंपरिक अंदाज करत या गोंधळ गाण्यावर डान्स केला आहे. या वयात त्यांची ही एनर्जी पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनीही त्यांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – आबासाहेब व अहिल्यादेवींच्या नात्यातील दुरावा येणार का समोर?, पारूच्या जीवालाही धोका अन्…
ऐश्वर्या व अविनाश यांच्या या व्हिडीओवर त्यांची एनर्जी पाहून अनेकांनी त्यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. मात्र या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका नेटकऱ्याने ट्रोल करत त्यांना, “कुठे किती एनर्जी लावायची हे समजण्या इतके तुम्ही लहान नाही. उगीचच माकडचाळे करायचे”, असं म्हटलं आहे. यावर ऐश्वर्या यांनी त्या नेटकऱ्याला उत्तरही दिलं आहे. ऐश्वर्या यांनी नेटकऱ्यांच्या या कमेंटवर उत्तर देत, ” तुम्ही इथे चुकीची एनर्जी लावत आहात. सकारात्मक ऊर्जा सगळीकडे निर्माण करा”, असं म्हटलं आहे.