Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम व दिशाच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु झालेली असते. दिशाला पारू व आदित्य यांवर शंका असते की, ते नक्कीच जाऊन प्रियाला घेऊन येतील आणि माझं लग्न मोडतील. त्यामुळे दिशा युक्ती लढवून पारुला स्वतःबरोबरच ठेवायचं ठरवते आणि अहिल्यादेवींना सांगते की, पारू आजचा दिवस माझ्याच मदतीला राहू द्या. अहिल्यादेवींचा आदेश असतो त्यामुळे पारूला दिशा बरोबरच राहावं लागतं. तर इकडे आदित्यची घालमेल सुरु असते. काही झालं तरी दिशाच्या तावडीतून पारूला सोडून तिला प्रियाच्या गावी पाठवावच लागेल, या विचारात आदित्य असतो.
त्यावेळी त्याचीही घालमेल श्रीकांतला समजते आणि श्रीकांत आदित्यला याबाबत विचारणा करतो. यावर आदित्य सांगतो की, काय आहे ते सगळं मी तुला नक्की सांगेन पण आता पारूला मला एका ठिकाणी पाठवायचं आहे. त्यामुळे तिला काही करुन दिशाकडून सोडवायलाच लागेल. आईचा आदेश असल्यामुळे तो मी मोडू शकत नाही असं आदित्य सांगतो. श्रीकांत ऑफिसच्या कामाचं निमित्त काढत अहिल्यादेवींना पारुला पाठवायला सांगतो.
आणखी वाचा – “एक्स गर्लफ्रेंडकडे पुन्हा जाणार सूरज चव्हाण?”, प्रश्न विचारताच म्हणाला, “माझ्या बच्चाला…”
त्यानुसार पारू आदित्य बरोबर निघून जाते. आता आबासाहेब व अहिल्यादेवी यांच्यात वीस वर्षांपूर्वी असं काय झालेलं. त्यांच्या नात्यात दुरावा हा नेमका का आला आहे, हे कारण शोधून काढणं आदित्यला खूप महत्त्वाचं वाटतं. पारू ही नेमकी प्रियाकडे जात आहे याची खबर दिशालाही लागलेली असते. त्यामुळे पारू प्रियाकडे कशी पोहोचणार नाही याची दिशा व्यवस्थित व्यवस्था करताना दिसते. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे करणला आदित्यने पैसे देऊन सगळे पुरावे घेऊन बोलावलेलं असतं. मात्र दिशाच्या सांगण्यावरुन करणचा अपघात होतो.
आणखी वाचा – Video : “दाजी एकदम भारी…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सूरजचं भाष्य, बहीण-भावाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
तर इकडे पारूची गाडी सुद्धा प्रियाच्या गावी जात असतानाच दिशाची काही माणसं पारूच्या गाडीच्या पाठी लागलेली असतात. आता पारू सुखरूप प्रियाच्या गावी पोहचेल का?, की पारूच्या जीवाचं काही बरं-वाईट होईल हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.