सध्या मुंबई शहरात जनतेला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याचे दुरुस्तीकरण करुन डांबरीकरण केले जात आहे. त्यासाठी २४ मेपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जोरदार काम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यायाने या रस्त्याच्या बांधकामासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे मार्ग बदलण्यातही आले आहेत. दरम्यान ठाणे-घोडबंदर रोडवर या वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. (Namrata Sambherao and Chetana Bhatt Video)
ठाणे-घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी एका मार्गाची वाहतूक थांबवली जात आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांनाही करावा लागत आहे. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी या वाहतूक कोंडीवर आवाज उठवलेला पाहायला मिळाला. यानंतर आता आणखी दोन कलाकारही या वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत.

अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव व चेतना भेट यांनी ही वाहतूक कोंडीदरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी वाहतूक कोंडीमुळे झालेली निराशा व्यक्त करण्यासाठी नम्रता व चेतना हे धमाल, मस्ती करत आहेत. चेतना ट्रेंडिंग रीलवर डान्स करतानाही दिसली. शूटिंगनंतर घरी परतत असताना चेतना व नम्रता एन्जॉय करताना दिसत आहेत.
आजवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नम्रता व चेतना यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. नम्रता व चेतना नेहमीच त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आजवर त्यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही नम्रता व चेतना बऱ्यापैकी सक्रिय असतात, नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.