टेलिव्हिजन हे मनोरंजनाचे सक्षम माध्यम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मालिकेच्या निर्मात्यांकडून नेहमीच नवनवीन विषय हाताळले जातात. असाच एक नवीन विषय घेऊन एक नावईकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि ही नवीन मालिका म्हणजे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’. स्टार प्रवाहवर ही नवीन मालिका सुरु होत असून या मालिकेचे नवीन प्रोमो प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिके मुख्य अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांचा प्रोमो आला होता. त्यानंतर मानसी कुलकर्णी व अभिनेता समीर परांजपे यांच्या प्रोमोने लक्ष वेधले होते.
अशातच आता या मालिकेच्या मुख्य जोडीचा आणखी एक नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या नवीन प्रोमोमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिजीत परांजपे यांची खास झलक दिसत आहेत. या नवीन प्रोमोमध्ये दोघेही देवळात देवाकडे प्रार्थना करत दिसत आहेत. यावेळी शिवानी सुर्वे देवाला “तू माझ्याबरोबर असलास तर मी माझ्या आदर्श गायत्री मॅमचा राग नक्की घालवेन” असं म्हणत तेथील दानपेटीत शंभर रुपयाची नोट टाकते व वरील १ रुपया सुट्टे नसल्याने “१ रुपया सुट्टा नाही, पणं तरी लक्ष असूदे” असं म्हणते.
यानंतर समीर देवाकडे येऊन प्रार्थना करत असं म्हणतो की, “तू फक्त साथ दे, मीए गायत्री वहिनींना वाडा विकू देणार नाही”. यानंतर तो मी पाकीट घरी विसरलो असल्यामुळे “हा एकच रुपया आहे” असं म्हणत तो रूपया तो दानपेटीत टाकतो आणि देवाला माझं ऐकशील ना” असं म्हणतो. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा हा नवा जबरदस्त प्रोमो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. “खूप छान”, “कडक प्रोमो”, “सुपर प्रोमो”, “व्वा”, “फायनली समीर व शिवानी यांची नवीन मालिका पाहायला मिळणार”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमोवर दिल्या आहेत.
दरम्यान, या नवीन मालिकेसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता समीर परांजपे तब्बल आठ वर्षांनी या वाहिनीवर पुन्हा एकदा परतला आहे. आठ वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’वरील त्याची ‘गोठ’ मालिका चांगली गाजली होती. तर शिवानी सुर्वेची ‘देवयानी’ ही मालिकादेखील याच वाहिनीवर विशेष गाजली होती. अशातच आता या दोन गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. त्यामुळे चाहते आतुरतेने या मालिकेची वाट पाहता आहेत.