मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य गाजवले आहे. अगडी मराठी नाटकापासून ते हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळी जागा प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे,रितेश देशमुख, नाना पाटेकर, स्वप्नील जोशी,सोनाली कुलकर्णी असे अनेक कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला दिसून आले आहेत. अशातच आता एक मराठी अभिनेत्री हिंदीतील आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील वनिता खरात. वनिताने याआधी ‘कबीर सिंह’ या चित्रपटांमध्येही काम केले होते आता पुन्हा एकदा अभिनेता मिलिंद सोमणबरोबर अभिनय करताना दिसणार आहे. याबाबत स्वतः वनिताने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. (vanita kharat with milind soman)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून वनिता घरा घरात पोहोचली. या आधी ती शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. भूमिका लहान असली तरी अजूनही तिची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान आता ती मिलिंदबरोबर जाहिरात करताना दिसणार आहे. याबद्दल तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये वनिता साडीमध्ये असून तिच्या कानाला हेडफोन लावले आहेत. तसेच मिलिंद ट्रेडमिलवर वर्कआऊट करताना दिसत आहे. ही जाहिरात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदी कलाकाराबरोबर तिची ही पहिलीच जाहिरात असून ती यासाठी खूप उत्सुक असल्याचे समजले आहे. वनिताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसून येत आहे. तसेच ती ‘सुंदरी’ या मालिकेतही काम करत आहे.
मिलिंदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तरतो त्याच्या अभिनयाबरोबरच आपल्या फिटनेससाठी अधिक चर्चेत असतो. तो लोकांना नेहमी फिटनेसच्या बाबतीत काही ना काही सल्ले प्रेक्षकांना देत असतो. त्याची ‘फोर मोर शॉट्स’ या सिरिजमधील त्याच्या भूमिकेला चांगलीच गाजली. तसेच तो अनेक शोचे सूत्रसंचालन करतानादेखील दिसतो. तो आता ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटामध्ये सॅम माणेकशॉ यांची भूमिका करताना दिसणार आहे.