शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सात ते आठ मिनिटं लेक मला मिठी मारुन होता अन्…”, श्याम राजपूत यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग म्हणाले, “जेव्हा माझ्या घरात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 27, 2024 | 7:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actor Shyam Rajput Emotional Moment

“सात ते आठ मिनिटं लेक मला मिठी मारुन होता अन्...”, श्याम राजपूत यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग म्हणाले, “जेव्हा माझ्या घरात...”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर सर्वांच्याच हृदयामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपला जीवनप्रवास माध्यमांसमोर व्यक्त केला. त्यातील एक आघाडीचा आणि लाडका अभिनेता  म्हणजे श्याम राजपूत. श्याम राजपूत यांनी नुकतंच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील अनेक पैलू प्रेक्षकांसमोर आले. खळखवून हसवणारा अभिनेता ते हळवा बाप नक्की कसा आहे याबद्दलची भावना समोर आली. (actor Shyam Rajput Emotional Moment)

कार्यक्रमाच्या सेटवर श्याम नेहमी नेहमीच हसत खेळत वावरत असतात. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने ते त्यांच्या स्किटमध्ये आपला जीव ओततात. श्याम यांचा आपल्या कुटुंबावर खूप जीव आहे. त्यांना एक मुलगा असून त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ते खूप कौतुकाने आपल्या सहकाऱ्यांना सांगत असतात. अशातच मुलाखत सुरू असताना त्यांना एक प्रश्न विचारला गेला की, “इतकी प्रसिद्धी मिळालेली असताना तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत जेव्हा वेळ घालवता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आतापर्यंतचा आलेला हळवा क्षण कोणता?”, त्यावर ते म्हणाले की, “मी एकदा चित्रीकरण संपवून खूप दिवसांनी घरी गेलो होतो. कोरोना काळात हास्यजत्रेचे चित्रीकरण हे दमणमध्ये सुरू होते. त्यामुळे तब्बल ४० ते ४२ दिवसांनी मी माझ्या घरी म्हणजे छत्रपती संभाजी नगरला गेलो होतो, जेव्हा मी माझ्या घरात पाऊल ठेवले तेव्हा  झटकन माझा मुलगा मला येऊन बिलगला. तेव्हा तो जवळपास सात ते आठ मिनिटे काही न बोलता फक्त बिलगून होता. तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता. त्याचवेळी माझी बायको,माझे आई-बाबा , माझा भाऊ यांच्याकडे मी जेव्हा पाहतो तो क्षणही माझ्यासाठी खूप खास असतो”, असेही त्यांनी सांगितले.  

आणखी वाचा – कपाळी मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा अन्…; हळदीनंतर पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, साऊथ इंडियन लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Shyam Rajput (@shyam.rajput.779)

पुढे त्यांनी मुलाबद्दलचा अजून एक प्रसंग सांगितला,ते म्हणाले की, “मी हास्यजत्रेमधून प्रसिद्ध झाल्यामुळे शाळेमध्ये त्याच्या मित्रांबरोबर फोटो काढावा म्हणून घेऊन जातो. सर्वांबरोबर फोटोही काढण्यास सांगतो”, असे सांगितले.

आणखी वाचा – मुळ युकेचा, दुबईमध्ये राहतो अन्…; सोनाली कुलकर्णीचा नवरा नक्की काय काम करतो?, पहिल्यांदाच अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “मोठमोठ्या बँकांमध्ये…”

यानंतर “मुलाने कधी कामाची पोचपावती दिली आहे का ?” असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सांगितले की, “एकदा शिवाली परबबरोबर माझे एक स्किट सुरू होते ज्यामध्ये तिने लहान मुलीची भूमिका केली होती. वनिता खरातही त्यामध्ये होती. शिवाली माझ्याबरोबर खूप मस्ती करत होती, त्रास देत होती तेव्हा तो खूप खळखळून हसला होता. माझ्या मुलाचे खळखळून हसणे हीच माझ्यासाठी खरी पोचपावती आहे”, असे अगदी भावनात्मक होऊन त्यांनी सांगितले. श्याम त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या सर्व प्रसंगांवर अगदी भरभरून बोलले आणि अगदी दिलखुलास गप्पाही मारल्या.   

Tags: comedy actoremotional momentinterviewmaharashtrachi hasyajatrashyam rajput
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding

लग्नानंतर बहिणीच्या शेजारीच राहणार तितीक्षा तावडे, खुशबूने सुखी संसारासाठीही दिल्या खास टिप्स, म्हणाली, "लग्न ठरेपर्यंत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.