रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर बहिणीच्या शेजारीच राहणार तितीक्षा तावडे, खुशबूने सुखी संसारासाठीही दिल्या खास टिप्स, म्हणाली, “लग्न ठरेपर्यंत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 27, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding

लग्नानंतर बहिणीच्या शेजारीच राहणार तितीक्षा तावडे, खुशबूने सुखी संसारासाठीही दिल्या खास टिप्स, म्हणाली, "लग्न ठरेपर्यंत…"

अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या शाही विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अखेर ही जोडी काल लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. लग्नसोहळ्यासाठी केलेल्या दोघांच्या पारंपरिक लूकचीही सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. जवळचे कुटुंबीय, नातेवाईक व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत तितीक्षा व सिद्धार्थ यांचा लग्नसोहळा पार पडला. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding)

तितीक्षाच्या लग्नाला तिची बहीण अभिनेत्री खुशबू तावडेही भाव खावून गेली. बहिणीच्या लग्नासाठी खुशबूचा खास लूक लक्षवेधी ठरला. तितीक्षा व खुशबू यांच्यातील बहिणीचं नातं सर्वांनाच माहित आहे. खुशबूने आजवर मोठी बहीण म्हणून लहान बहिणीची जबाबदारी अचूकरीत्या सांभाळली आहे. दोघा बहिणींमधील बॉण्डिंग नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतं. तितीक्षाच्या लग्नाची जबाबदारीही खुशबूने पेलवत अगदी योग्य पद्धतीने हा शाही विवाहसोहळा पार पाडला.

आणखी वाचा – ना भरजरी साडी, ना लेहेंगा; लग्नानंतरचा मिसेस बोडकेचा नवा लूक पाहिलात का? साधेपणाने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत खुशबूने बहिणीबद्दलची काळजी व्यक्त केली. “तितीक्षा व तुझं नातं हे बहिणींपेक्षा आई मुलीचं असं अधिक असल्याचं नेहमीच जाणवतं, आता लग्नसोहळ्याला आई या नात्याने तू कशी जबाबदारी पेलवणार आहेस?”, असा प्रश्न खुशबूला विचारण्यात आला होता, तेव्हा ती म्हणाली, “मुळात मी व तितीक्षा जवळजवळ दहा-बारा वर्ष शिक्षणासाठी, करिअरसाठी घरापासून दूर आहोत. त्यामुळे नवीन असं काही नाही. त्यामुळे तितीक्षा लग्न करुन घरापासून दूर कुठेतरी जाणार आहे असं नाही आहे. याचं कारणही मला माहीत आहे. ती माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्येच राहायला येणार आहे. त्यामुळे लांब कुठेतरी जाणार अशी धाकधूक नाही आहे. पण लग्नाच्या दिवशी काळजी वाटणार हेही खरं आहे”, असंही ती म्हणाली.

आणखी वाचा – वेस्टर्न स्टाइल लेहेंगा अन् हिरव्या बांगडया; पूजा सावंतचा हळदी समारंभासाठी हटके लूक, नवऱ्याबरोबर रोमँटिक पोज देतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुढे ती म्हणाली, “एक आई म्हणून लग्न ठरेपर्यंत खूप जबाबदाऱ्या होत्या. काही निर्णय, तिच्याशी एखाद्या विषयावर संवाद असेल वा लग्नापर्यंत हे नातं नेण्यापर्यंतची प्रोसेस असेल प्रत्येक गोष्ट मला सांभाळावी लागली. लग्न ठरल्यानंतर नाही तर लग्न ठरण्याआधीपासून मी तिला आईपण दाखवलं. आयुष्यात, संसारात येणारे चढ-उतार कसे असतात ते ती माझ्या संसारातून पाहत आली आहे. त्यामुळे आई म्हणून तिला सांभाळण्याची जबाबदारी कायम असेल”.

Tags: khushboo tawdemarathi actresstiteeksha tawdeTiteeksha Tawde Siddharth Bodke WeddingTiteeksha Tawde Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Raj Thackeray give advice to Sankarshan Kharhade see the details

Video : भरकार्यक्रमात स्टेजवरच संकर्षण कऱ्हाडेकडून घडली 'ती' चूक, राज ठाकरेंनी ऐकताच लगेचच सुनावलं, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.