बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, कोण आहेत ‘हे’ आरोपी?, कोणाशी आहे खास कनेक्शन?, जाणून घ्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 16, 2024 | 4:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman Khan House Firing

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, कोण आहेत 'हे' आरोपी?, कोणाशी आहे खास कनेक्शन?, जाणून घ्या…

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर रविवारी दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनंतर पोलीस व गुन्हे शाखा सतर्क झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अशातच आता पोलिसांच्या या तपासाला यश मिळाले आहे. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. (Salman Khan House Firing)

या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच मंगळवारी गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. आता आरोपींची चौकशी सुरु आहे. या दोघांनी योजना कशी तयार केली? ते कधीपासून सलमानच्या घरावर नजर ठेवत होते?, याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की गुप्ता व सुनील पाल अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात मुंबईत आले होते आणि तेव्हापासून ते गोळीबाराची योजना आखत होते.

आणखी वाचा – “तो माझा देव, माझी जीव घ्या पण…”, सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला राखी सावंतला सहन होईना, म्हणाली, “खरं काय माहित नाही तरीही…”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी गेल्या २ वर्षांपासून बिश्नोई टोळीसाठी काम करत होते. सुनील दुचाकीवरून जात असताना सागर पाल याने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. प्रथम सागर बिश्नोई टोळीचा भाग बनला त्यानंतर विकी या टोळीत सामील झाला. या दोन वर्षांत बिष्णोई टोळीने या दोन आरोपींना दिलेले हे पहिले काम होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी व सुनील फेब्रुवारी महिन्यात मुंबईत आले होते. आरोपींनी मध्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती आणि तेव्हापासून ते सलमान खानच्या घराची म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करत होते. काही दिवसांनंतर दोन्ही आरोपी पनवेलच्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण सोसायटीत एका फ्लॅटमध्ये राहू लागले. ते पनवेलहून मुंबईत यायचे आणि सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर नजर ठेवायचे.

आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाचं ऑस्ट्रेलियामध्ये जंगी सेलिब्रेशन करतेय पूजा सावंत, हातातील हिरव्या चुड्याने वेधलं लक्ष, म्हणाली, “ज्याने माझं आयुष्य…”

View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

आरोपींनी त्यांच्या फ्लॅटचा करारनामाही केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींनी २५-३० हजार रुपये देऊन भाड्याने घर घेतले होते. २४ हजार रुपयांना दुचाकी खरेदी केली. दुचाकीच्या प्रकरणात आरोपींनी दुचाकीची पूर्ण रक्कमही भरली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संधीचा फायदा घेत रविवारी आरोपींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला आणि गुजरातला पळून गेले. मात्र, तेथून दोन्ही आरोपी पकडले गेले आहेत.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खरेदी केली लाखो रुपयांची कार, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “अट्टाहास केला…”

या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतल्याची माहिती आहे. अनमोलने एक फेसबुक पोस्ट केली होती ज्यात त्याने लिहिले होते की, “हा फक्त एक ट्रेलर आहे”. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोईनेच सलमानला मारण्यासाठी आपले शूटर पाठवले होते. बिश्नोई यांच्या पोस्टसाठी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे. पोस्टाचा आयपी पत्ता पोर्तुगालचा असल्याचे आढळून आले आहे. बिश्नोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानले जाते. काळवीट मारल्याप्रकरणी सलमान खानवर खटला सुरु आहे. याच कारणामुळे १९९८च्या काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला अनेकदा धमक्या दिल्या आहेत.

Tags: bolywood actorentertainment newssalman khanSalman Khan House Firing
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Sanskruti Balgude shared post about why she is away from social media for some time.

गोठवणारी थंडी, पाणी टंचाई, वीज पुरवठा आणि...; ध्यान व मनःशांतीसाठी हिमाचल प्रदेशला गेली होती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, "आयुष्यात..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.