सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एकुलत्या एक मुलीलाही वेळ देता येत नाही आणि…”, सविता प्रभुणेंचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाल्या, “मालिका करताना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2024 | 4:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ghroghari Matichya Chuli fame Savita prabhune talked about she is not being able to give time to her daughter

"एकुलत्या एक मुलीलाही वेळ देता येत नाही आणि...", सविता प्रभुणेंचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाल्या, "मालिका करताना..."

स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. यापैकी एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’. नव्याने सुरु झालेली ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत असून रणदिवेंच्या घरी जानकीची जाउबाई येणार आहे. रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. खरंतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला.

यानिमित्ताने नुकताच ‘इट्स मज्जा’ने मालिकेतील सविता प्रभुणे व प्रमोद पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळे त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातील त्यांच्या लेकींविषयी असलेल्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत सविता प्रभुणे यांनी असं म्हटलं की, “माझी एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्याबरोबर माझं खास नातं आहे. कामानिमित्त दोघींनी फार वेळ देता येत नाही. पण वेळ मिळेल तेव्हा आम्ही खूपच गप्पा मारतो. तसेच आता ही नवीन मालिका असल्यामुळे मी मालिकेला जास्त वेळ देत आहे.”

आणखी वाचा – “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक”, डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लांडगेदादा आम्हाला…”

यापुढे मालिकेत नुकतेच सौमित्र व अवंतिका पळून जाऊन लग्न करतानाचे पाहायला मिळाले. याबद्दल सविता प्रभूने व प्रमोद पवार यांना विचारण्यात आले. याचे उत्तर देत सविता यांनी असं म्हटलं की, “मुलं जर प्रत्येक बाबतीत स्वतंत्र विचारांची आहेत, तर त्यांनी आपल्या आई-वडिलांशी मोकळा संवाद साधला पाहिजे. आपले विचार मांडले पाहिजेत आणि आई-वडिलांची त्यावर काय मतं आहेत, याचा विचार करुन त्यावर मार्ग काढला पाहिजे.”

आणखी वाचा – “सिगारेट ओढणारच आणि…”, कॅन्सरनंतर डॉक्टरांनी ओरडूनही ऐकले नाहीत महेश मांजरेकर, म्हणाले, “मरणार नसल्याची शाश्वती द्या तरच…”

यापुढे प्रमोद पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर देत असं म्हटलं की, “तुम्ही स्वतंत्र झालात म्हणून काही वाट्टेल ते कराल असं होत नाही. त्याचे परिणाम आई-वडिलांना भोगावे लागतील असं जर काही होणार असेल तर ते योग्य नाही. यामुळे जातीपासून पातीपर्यंत सगळ्या गोष्टी बदलत जातात. तर ते होऊन याची काळजी घेतली पाहिजे. आपण आता बातम्यांमधून मुलींचे काय होतं हे बघतो. तर त्यांची काळजी मुलांना असतेचं मुली आपल्या एका भ्रमात असतात आणि लग्न करुन मोकळ्या होतात. पण नंतर त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. तोच त्रास आई-वडिलांनासुद्धा होत असतो. ते होऊ नये म्हणून जर आधीच संवाद झाला तर त्याचा फायदा होईल. मुलींना सांभाळणं ही आनंदाची गोष्ट असली तरी तितकीच कठीण गोष्ट असते. समाजात त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे त्यांनी स्वत:ची काळजी घेणे व आई-डिलांच्या मार्गदर्शनाला पाठिंबा देणे आहे.”               

Tags: Ghroghari Matichya Chulimarathi entertainment newsmarathi serialSavita Prabhune
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aishwarya Rai Bachchan Ignores Niece

Video : नणंदेबरोबर ऐश्वर्या रायचं वैर, पण त्याचा राग अभिनेत्रीने भाचीवर काढला अन्…; 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "बिचारी मुलगी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.