‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद या कार्यक्रमाचा महत्त्वाचा सदस्य तर आहेच. शिवाय तो या कार्यक्रमातील अनेक विनोदी स्किट्सचे लिखाण देखील करतो. त्याने केलेल्या ‘अवली लवली कोहली’सह अनेक स्किट्स तुफान गाजले. त्याचबरोबर ‘कुर्रर्रर्र’ या नाटकातून त्याने रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवली. एरव्ही नाटक व विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारा प्रसाद आता चित्रपटांमधून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Prasad Khandekar son Shlok dance in Shahrukh khan song)
विविध माध्यमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र वेगळा आहे. जेव्हा तो घरी असतो, तेव्हा पती व वडिलांची जबाबदारी तो उत्तमरीत्या सांभाळताना दिसतो. प्रसादला श्लोक नावाचा मुलगा असून त्याचे अनेक गोंडस व्हिडीओ व फोटो नेहमीच शेअर करतो. प्रसादने त्याच्या लेकाचा एक सुंदर व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. जो त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.
हे देखील वाचा – Video : एका दुचाकीवर चार माणसं, अजिंक्य देव यांनी व्हिडीओ शेअर करत दाखवली ‘ती’ सत्य परिस्थिती, म्हणाले, “गाडी ठोकणार पण…”
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज वाढदिवस. त्यानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसादचा लेक श्लोकनेही खास शाहरुख स्टाईलमध्ये डान्स करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला, ज्यात श्लोक शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यावर थिरकताना दिसतो. यावेळी त्याचा लेक खास शाहरुखची सिग्नेचर स्टेप करताना दिसून आला. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने “Happy birthday king khan from my PRINCE” असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – “प्रतिष्ठा, आदर गमावला अन्…”, नावाजलेल्या विमान कंपनीवर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “प्रवाशांची माफी…”
श्लोकचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना तुफान आवडला असून अनेक नेटकरी यावर कमेंट करताना दिसत आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव, पौर्णिमा डे यांनीही व्हिडीओवर कमेंट करत त्याच्या डान्सचे कौतुक केले. त्याचबरोबर चाहत्यांनीही यावर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्रसाद सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाव्यतिरिक्त त्याच्या आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्याचा हा लेखन-दिग्दर्शन असलेला पहिलाच चित्रपट आहे. यामध्ये नम्रतासह विशाखा सुभेदार, सयाजी शिंदे, गिरीश कुल्कर्णीसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. लवकरच हा चित्रपट येणार असून चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.